💥परभणीतील हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क साहेब उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी शेख शब्बीर शेख मोहम्मद यांची निवड...!💥तर उपाध्यक्ष पदावर अब्दुल खालेद अब्दुल रशीद यांची निवड💥

परभणी (दि.31 जानेवारी) : हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क साहेब यांच्या उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते शेख शब्बीर शेख मोहम्मद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

           महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जूनेद सय्यद यांनी आज मंगळवार दि.३१ जानेवारी २०२३ रोजी उर्सा निमित्त मान्यवरांची एक तात्पुरती समिती देखरेख ठेवण्याकरीता नियुक्त केली असून या समितीच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक शेख शब्बीर शेख मोहम्मद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून अब्दुल खालेद अब्दुल रशीद तर सदस्य म्हणून वहीद खान हमीद खान पठाण, अतीक पटेल, मतीन तांबोळी, सय्यद शकील, वसीम खालेद शेख, सय्यद शोएब हाशमी, अब्दुल बारी, अब्दुल रशीद, शाहेर समीर खान व मिर्झा तौसिफ अली बेग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            या समितीद्वारे संपूर्ण उर्स व्यवस्थित पार पाडावा यासह भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने देखरेख असावी, अशी अपेक्षा वक्फ बोर्डाने व्यक्त केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या