💥राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर हे व्यक्तिमत्व विकासाचे माध्यम असते - डॉ.अविनाश शिंदे


💥राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष वार्षिक शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.शिंदे हे बोलत होते💥

पूर्णा (दि.१९ जानेवारी) - राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर हे व्यक्तिमत्व विकासाचे माध्यम असते असे प्रतिपादन  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे अधिसभा सदस्य डॉ अविनाश शिंदे यांनी केले ते स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष वार्षिक शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. 

याप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना विविध कला गुण विकसित करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर एक महत्वाचे माध्यम असते.  ग्रामीण भागात जाऊन विद्यार्थी श्रमदान करतात आणि विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात,  यातूनच त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होत असतो. ग्रामीण जीवन संस्कृती आणि व्यापक जीवनाची अनुभुती अशाच शिबिरात मिळत असते असेही त्यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक सचिव प्राध्यापक डॉ. रामेश्वर पवार हे होते. अध्यक्षीय समारोपप्रसंगी ते म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय बाळगण्याची गरज आहे.स्पर्धेच्या युगात काही बनायचे असेल तर परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून विद्यार्थ्यांनी श्रमप्रतिष्ठा जोपासली पाहिजे.   कोणतेही कार्य करतांना स्व:ताला कमी समजू नये असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. 

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष कुऱ्हे, अधिसभा सदस्य डॉ. विजय भोपाळे, गोविंदपूर गावचे सरपंच नितीन लोखंडे,  उपसरपंच रंगनाथ शिंदे,  तंटामुक्तीचे अध्यक्ष भुजंगराव लोखंडे, पोलीस पाटील पंकज लोखंडे, येथील शाळेचे मुख्याध्यापक रमेश लिंगनवार, रंगनाथ चौधरी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉ. पी. डी. सूर्यवंशी यांनी मांडले. सूत्रसंचालन  कार्यक्रमाधिकारी डॉ. दीपमाला पाटोदे यांनी केले या  तर आभार प्रदर्शन उपसरपंच रंगनाथ शिंदे यांनी मानले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या