💥'मासिक पाळी व्यवस्थापन व स्त्रियांचे आरोग्य' विषयावर आयोजित निबंध/चित्रकला स्पर्धेतील जिल्हास्तरीय विजेत्यांचा गौरव....!


💥एचएआरसी संस्थेचा उपक्रम💥


परभणी (प्रतिनिधी) - सावित्री-जिजाऊ महोत्सवानिमित्याने होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्था व शिक्षण विभाग परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने  जिल्हा परिषद शाळा, खाजगी अनुदानित शाळेतील महिला शिक्षकांसाठी व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील इयत्ता 8 वी ते 10 वीत शिकणाऱ्या मुली यांच्यासाठी  'मासिक पाळी व्यवस्थापन व स्त्रियांचे आरोग्य' या विषयावर संपूर्ण परभणी जिल्ह्यात निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील 2200 विद्यार्थिनींनी सहभागी नोंदवला. 


* ही स्पर्धा खालील विषयावर आयोजित करण्यात आली होती :-      

निबंध स्पर्धेचे विषय: 1) माझी पहिली मासिक पाळी 2) मासिक पाळी निसर्गाने दिलेले वरदान 3) सॅनिटरी पॅडचे फायदे व दुष्परिणाम व पर्यावरणपूरक पर्याय  4) मासिक पाळीविषयी समज, गैरसमज, अनिष्ट प्रथा


* या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे आहेत :-

*जिल्ह्यास्तरीय निबंध स्पर्धा*

प्रथम - गिणगीने आकांक्षा ज्ञानेश्वर - ओंकारेश्वर माध्यमिक विद्यालय 9 वी त्रिधारा ता परभणी

द्वितीय: अनुजा मनोज फाळके- भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतराष्ट्रीय शाळा माळीवाडा ता पाथरी 

तृतीय: शुभांगी दिलीपराव कदम - जिल्हा परिषद प्रशाला एरंडेश्वर ता पूर्णा जि परभणी

* चित्रकला स्पर्धा जिल्हास्तरीय निकाल :-

प्रथम: कु पल्लवी किशन वाकळे इयत्ता 10 वी, जिल्हा परिषद प्रशाला बामनी (खु) ता जिंतूर

द्वितीय: कु ज्ञानेश्वरी रामकीशन डुकरे इयत्ता 8 वी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडूळा ता पाथरी

तृतीय: कु सुमन गजानन मोगल इयत्ता 8 वी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंडी ता सेलू 

उत्तेजनार्थ: कु दीपाली सुंदरराव काळे इयत्ता 9 वी, जिल्हा परिषद प्रशाला एरंडेश्वर ता पूर्णा उत्तेजनार्थ : संस्कृती बोडखे इयत्ता 9 वी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मानवत इयत्ता 9 वी आज या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, बक्षीस व प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला.

        या प्रसंगी प्रास्ताविक एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक यांनी केले या प्रसंगी आयोजक एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, डॉ आशा चांडक, CA अरुणकुमार ओझा, संदीप भंडे, प्रा प्रेमेंद्र भावसार, प्रा पद्मा भालेराव,  गोपाळ मुरक्या आदी उपस्थित होते. 

या स्पर्धेत निबंध स्पर्धेचे परीक्षण डॉ शिवा आयथळ, डॉ आशा चांडक, राजेश्वर वासलवार, प्रा पूजा काकडे, ऍड शीतल राजुरे, प्रा शीतल गिराम, प्रा पद्मा भालेराव, प्रा झहीर बेग, तर चित्रकला स्पर्धेचे सिद्धार्थ नागठाणकर व पांडुरंग पाटणकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या