💥पुर्णेतील अभिनव विद्या विहार प्रशालेची विद्यार्थीनी स्नेहा काळे हिचे विविध स्पर्धा परिक्षेत यश....!


💥डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा सायंन्स ओलिम्पियाड मध्ये उत्तीर्ण तर पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत अव्वल💥


पुर्णा (दि.०६ जानेवारी) - पुर्णा शहरातील नामांकीत शिक्षण संस्था असलेल्या अभिनव विद्या विहार प्रशाला या शाळेत इयत्ता ०९ वीत शिक्षण घेणारी विद्यार्थीनी कु.स्नेहा झेलाजी काळे हिने डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा इयत्ता ०९ वी साठीची लेखी परिक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवून त्यापुढील टप्पा प्रात्यक्षिक परिक्षेसाठी ती ठरली आहे.

सायंन्स ओलिम्पियाड फाऊंडेशनची एनएसडी (National Science Olympiad) या परिक्षेत सुध्दा स्नेहा काळे ही गोल्ड मेडल व सहभाग प्रमाणपत्र मिळवून उत्तीर्ण झाली आहे तसेच महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांची पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा २०२२ मध्ये इयत्ता ०८ वी मधून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत २३ वी रँक मिळवून तालुकास्तरीय यादीत पहिले स्थान मिळवले असून तिच्या या यशाबद्दल तिचे अभिनव विद्या विहार प्रशाला या संस्थेचे अध्यक्ष आनंदसेठ अजमेरा,नगराध्यक्षा प्रतिनिधी मा.नगरसेवक संतोष एकलारे,श्री.गुरुबुध्दी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रमोद सितारामअप्पा एकलारे,शिक्षक विशाल राठोड,नरेंद्र उर्फ मुन्ना राठोड यांनी अभिनंदन केले आहे.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या