💥पुर्णा तालुक्यातील देगाव जिल्हा परिषद शाळेत राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी...!


💥यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष गंगाधर इंगोले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती💥

पुर्णा (दि.१२ जानेवारी) - पुर्णा तालुक्यातील देगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आज गुरुवार दि.१२ जानेवारी २०२३ रोजी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीसह स्वामी विवेकानंद यांचीं जयंती देखील उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष गंगाधर इंगोले व मुख्याध्यापक गोविंद कानडखेडकर यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेसह स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभीवादन केले यावेळी परडे मेंडम व यदलोठकर,जेठेवाड,व गायकवाड़ सर आदींसह शाळेतील विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या