💥जिंतूर शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची होतेय हेळसांड : तालुका रुग्णहक्क समिती करणार आमरण उपोषण....!


💥वैद्यकीय अधिक्षक डॉ.चांडगे व तालुका आरोग्य अधिकारी यांची तात्काळ बदली करण्याची रुग्णहक्क समितीने केली मागणी💥


जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड  होत असून रुग्णांना तात्काळ परभणी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात येते तर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून सर्रास गर्भ निदान व प्रसूतीपूर्व निदान केले जात असल्याने या बाबीकडे वैद्यकीय अध्यक्ष तालुका  आरोग्य अधिकाऱ्यांची दुर्लक्ष होत असल्याने त्यांचे तात्काळ बदली करण्यात यावी बदली न केल्यास अमोरण उपोषणांचा इशारा जिल्हाधिकांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

निवेदनात असेही म्हटले आहे की या रुग्णालयात विविध पदे रिक्त असून त्याचा तात्काळ भरण्यात याव्यात तसेच हे मुंबई ते नांदेड (निर्मल हायवे) परभणी ते अकोला अशा मध्यस्थिती जिंतूर हे मोठे तालुका असल्याने उपजिल्हा रुग्णालयांचा दर्जा देण्यात यावा रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी पूर्णवेळ मुलांसाठी द्यावा तालुक्यातील विना डिग्री बोगस  डॉक्टरांवर  कारवाई करून त्यांचे  रुग्णांच्या जीवाशी होत असलेली छळ थांबवून त्यांचे क्लिनिक बंद करण्यात यावे अशी मागणी निवेदना त करण्यात आली आहे त्यांच्या प्रति जिल्हा शिल्यचिकित्सक परभणी, तहसीलदार जिंतूर,पोलीस स्टेशन जिंतूर, यांना देण्यात आल्याचे म्हटले आहे.

या निवेदनावर रुग्ण हक्क समितीचे पदाधिकारी व सदस्यांच्या सह्या आहेत त्यात सय्यद फिरोज  मोईन, रफिक तांबोळी, रहीम शेख,माबुद मुबारक, राजेंद्र घनसावंत, कविता घनसावंत, राजकुमार शिंदे, शेख सरफराज, उषा पंचांगे, दिलीप बनकर आदींच्या साक्षर आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या