💥अंधश्रध्देला झुगारल्याशिवाय महिलांची उन्नती नाही - पुज्य भन्ते पंयावश


💥पुर्णेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी💥 

पूर्णा (दि.०३ जानेवारी) - महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे धडे दिल्या मुळे उच्च पदावर महिला विराजमान झाल्या आहेत महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी अंधश्रद्धा कर्मकांडाला कडाडून विरोध केला शिक्षणाचे दार उघडली आहेत परतू आजही महिला अधश्रद्धेमध्ये रुतून बसल्या आहेत अंधश्रद्धेच्या झुगारल्याशिवाय महिलाची उन्नती होणार नाही असे प्रतिपादन पुज्य भन्ते पंयावश यानी केले.


पूर्णा येथे डॉ.बी.आर आंबेडकर स्मारक व भारतीय बौद्ध महासभा व महिला मंडळ व बचत गट यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन पूर्णा शहरातील डॉ. आंबेडकर चौक येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका विजयाताई शरद कापसे प्रमुख पाहुण्या म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुनिता साळवे नपचे सहा प्रकल्प अधिकारी अंजना बिडगर डॉ. पिंकी डांगे पुष्पा बनसोडे संध्या गग्गड माजी नगरसेविका गयाबाई खदारे सुनिता बगाटे आदि उपस्थित होत्या तर कार्यक्रमास पुज्य भन्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.

या निमिताने प्रमुख उपस्थिता च्या वतीने डॉ. बाबा साहेब आंबेडकर याच्या पुतळ्यास व सावित्री ज्योती फुले जिजाऊ ' रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले त्या नतर महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सावित्री च्या वेशभूषा करून महिला उपस्थित होत्या विजयाताई कापसे यानी सावित्री फुले यांनी शाळा काढल्यामुळे महिला आज पुढ येत आहेत त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजुषाताई पाटील यांनी तर सुत्रसंचालन ज्योती उगले शिला दिपके यांनी आभार प्रतिभा हिवाळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिराबाई बोधक विशाखा एंगडे आशाबाई कसबे द्रोपदी सोनुले उषाताई गायकवाड शाताबाई टेकुळे शोभाबाई गायकवाड छायाबाई काळे जनाबाई धबाले,जनाबाई जोधळे प्राजक्ता एंगडे नागिनबाई गायकवाड यांनी प्रयत केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या