💥औरंगाबाद शिक्षक मतदार संघात प्रहारचा उमेदवार विजयी होणार - माजी मंत्री तथा आमदार बच्चूभाऊ कडू


💥प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार संजय तायडेंच्या प्रचारार्थ आज मा.मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी परभणीत शिक्षकांशी संवाद साधला💥

परभणी (दि.२९ जानेवारी) - मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचा आज प्रचार संपला असून सरते शेवटी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार संजय तायडे यांच्या प्रचारार्थ आज माजी मंत्री बच्चू कडू यांनी परभणीत शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिलीत. या निवडणूकीत पसंतीच्या क्रमाला मोठं महत्व असून आमचा प्रयत्न पहिल्या पसंतीची मत आमच्या पारड्यात कशी पाडून घेता येतील यासाठी आम्ही शिक्षकांपर्यंत पोहचत आहोत शिवाय आम्हाला जास्तीत जास्त दुसर्या पसंतीची मतं कशी मिळतील व कुणाकडून मिळतील तसंच आमची दोन क्रमांकाची मत कुणाला यायची याचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं. दरम्यान, या निवडणूकीत आमचा विजय महत्त्वाचा असून विदर्भ नंतर मराठवाड्यात प्रथमच प्रहारचा आमदार हा शिक्षक आमदार म्हणून निवडून येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रहार जनशक्ती पक्षाचे व मेस्टा चे औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमदेवार संजय तायडे यांच्या प्रचारार्थ आज माजी मंत्री बच्चू कडू यांनी परभणी जिल्ह्याचा दौरा केला. आज दुपारपासूनच त्यांनी पक्षाच्या विविध पदाधिकारी, शिक्षकांच्या गाठी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्याच बरोबर आपला उमेदवार विजयी कसा होईल या बाबतची रणनीती आखली. सायंकाळी पाच वाजता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयावर आपले मत मांडले. सध्या राज्यात सुरु असलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबतही त्यानी मत व्यक्त केलं असून लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल आणि त्या मंत्रीमंडळात आपलाला स्थान मिळेल असे पण यांनी सांगितले तसेच आपणास कोणते मंत्रालय मिळेल असे विचारल असता अपंग कल्यान मंत्रालय मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

बच्चू कडू म्हणाले, ही निवडणूक पसंतीक्रमाची असल्यामुळे दोन क्रमांकाच्या मतांवर बरेच काही अवलंबून आहे. आम्ही आमच्या मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी केलेली आहे त्याच बरोबर विविध पक्ष संघटना देखील आमच्या सोबत आहेत त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. आमच्या उमेदवाराला इतरांकडून दोन क्रमांकांची मते जास्तीत जास्त कशी मिळतील या बाबत आणि आमचीही दोन क्रमांकांची मतं कुणाला द्यायची या बाबतची काही उमेदवरांसोबत चर्चा करून आपण रात्री उशिरा या बाबतचा निर्णय घेवू असे बच्चू कडू यांनी पत्रकारांना सांगितले.

पत्रकार परिषदेस उमेदवार संजय तायडे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलींग बोधने आदींची उपस्थिती होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या