💥मराठी भाषा संवर्धन ही आत्मिक चळवळ बनावी - प्राचार्य डॉ वसंतराव भोसले


💥मराठी भाषा विभाग आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त उदघाटन प्रसंगी अध्यक्षिय समारोपात ते म्हणाले💥

परभणी ( प्रतिनिधी ) - मायबोली म्हणून मराठीचा दैनंदिन जीवनातील वापर  मराठी माणसाने जाणिवपूर्वक करावा. मराठी माणसांनी इंग्रजी आणि इतर भाषेचा वापर टाळत मराठीतूनच व्यक्त झाले पाहिजे. संतां सह विचारवंतांनी ज्ञान प्रसारा साठी आग्रहपूर्वक मराठी भाषेचा वापर केला आहे.आज इंग्रजी,हिंदी आणि तत्सम भाषेचा वाढता प्रभाव लक्षात घेत मराठी माणसाने मराठी भाषा संवर्धन ही आत्मिक चळवळ बनवावी,असे आवाहन प्राचार्य डॉ वसंतराव भोसले यांनी केले.


     कै.सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय,परभणी मराठी भाषा विभाग आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त उदघाटन प्रसंगी अध्यक्षिय समारोपात प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले बोलत होते.व्यासपिठावर प्रमुख वक्ते प्रा.डॉ.सचिन खडके, मराठी विभाग प्रमुख प्रा. अरुण पडघन,प्रा.डॉ.आशा गीरी यांची उपस्थिती होती.

              मराठी भाषा अभ्यासत असताना शिक्षितांनी इंग्रजी सह इतर भाषे च्या आधारे मराठी वर होणारे आक्रमण थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत. मराठी मायबोली विषयीची अनास्थाच मुळी तिचं अस्तित्व धोक्यात आणत आहे.खेडवळ अशिक्षित माणूसच मायबोली मराठीतून अधिक प्रभावीपणे व्यक्त होत आहे.पारंपरिक मराठी लोकगीत, संतवाणीतून मराठी भाषेचा सांस्कृतिक वसा आणि वारसा जतन केला जात आहे, असे मत प्रा.डॉ.सचिन खडके यांनी व्यक्त केले.

प्रा.अरुण पडघन यांनी प्रास्ताविक केले.प्रसंगी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमा साठी ५४ विद्यार्थींनींची उपस्थिती होती प्रा.अरुण पडघन यांनी संचलन केले.तर प्रा.डॉ.आशा गीरी यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या