💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - संपूर्ण देशभरातीला महत्वाच्या अपडेट/ हेडलाईन्स /बातम्या....!💥राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन ; 10 हजार डॉक्टर घेणार संपात सहभाग💥

✍️मोहन चौकेकर                                       

* सर्वाधिक श्रीमंतांच्या टाॅप 10 यादीतून अदानी बाहेर 

* राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे उद्या काम बंद आंदोलन; 10 हजार डॉक्टरांचा संपात सहभाग

* शिवजयंतीपासून जय जय महाराष्ट्र, गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, शिंदे-फडणवीस कॅबिनेटचा निर्णय 

* महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता 25 लाख रुपयांचा, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

* MPSC चा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार, शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा

* किरीट सोमय्यांना नाक घासायला लावणार; म्हाडाच्या लेखी पुराव्यानंतर अनिल परब आक्रमक

* कोट्यवधी पॉलिसीधारकांना LIC चा सुखद धक्का, अदानीच्या शेअर्सबाबत मोठा खुलासा

* विविध अडचणींवर मात करत देशातील कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी; आर्थिक सर्वेक्षण अहवालात कौतुक

 *1 एप्रिलपासून 9 लाख सरकारी वाहनांना रस्त्यावरुन करण्यात आलंय बॅन, 15 वर्षे जुनी झालेल्या वाहनांचा यामध्ये समावेश, नितीन गडकरींची घोषणा

* शायरी शेअर केल्याने आयुष्मान ट्रोल

 * 'विशाखापट्टणम' आंध्र प्रदेशची नवी राजधानी; मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची घोषणा 

* समंथा रुथ प्रभूच्या 'शकुंतला' भूमिकेवर चाहते झाले फिदा

* राज्य शासन तृणधान्य प्रक्रिया उद्योगांना अर्थसहाय्य करणार - मुख्यमंत्री; महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद

* विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश, राज्य सरकार सकारात्मक; मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची MPSC ला विनंती

* पीएम केअर्स फंड ही सार्वजनिक विश्वस्त संस्था या संस्थेची स्थापना संविधान तसेच संसदेने निर्माण केलेल्या कायद्यांतर्गत केलेली नाही - केंद्र सरकार

 * ‘वेड’ या मराठी चित्रपटाची ‘पठाण’ला टक्कर देत जगभरात 70 कोटी 90 लाख रुपये कमाई तर देशभरात कमावले 58 कोटी 11 लाख रुपये 

* मनसेचा ठाकरे गटावर पुन्हा हल्लाबोल,थेट ED ला पाठवलं पत्र ; कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराचे भक्कम पुरावे हाती लागल्याचा केला दावा

* मागील पाच वर्षांत नागपुरात 997 महिलांवर बलात्कार ; सर्वाधिक बलात्कारी प्रियकर,ओळखीचे व्यक्ती आणि नातेवाईकांकडूनच - राज्य पोलिसांचा अहवाल

* शेअर बाजार: सेन्सेक्स 49 अंकांच्या वाढीसह  59,549.90 अंकांवर तर निफ्टी 13 अंकांनी वाढत  17,662.15 अंकांवर बंद 

* “आंध्र प्रदेशची नवी राजधानी विशाखापट्टनम”, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी केली घोषणा

*एससीओ चित्रपट महोत्सवात गोदावरी या मराठी चित्रपटाने पटकावला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

* आगामी नागरी निवडणुकांपूर्वी BMC ची मोठी कारवाई ; भ्रष्टाचाराप्रकरणी 55 कर्मचारी बडतर्फ, तर 134 लोक निलंबित

* तलाखसाठी मुस्लिम महिला फक्त कौटुंबीक न्यायालयात जाऊ शकतात - मद्रास उच्च न्यायालय

* मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि बसचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

* एसटीची स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया ठप्पच:31 मार्चपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाची मुभा, महामंडळाकडून तूर्त दिलासा

* अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतमोजणीसाठी उद्या पुन्हा प्रशिक्षण,तयारी पूर्ण,2 फेब्रुवारीला निकाल

* पंतप्रधान आवास योजनेत 2 कोटी घरांचा संकल्प, पण आतापर्यंत 68 लाख घरे पूर्ण; केंद्र सरकारच्या संकेतस्थळावरील आकडेवारी

* महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम 10 लाख रुपयांवरून 25 लाख रुपये करण्याचा निर्णय; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय

* GDP : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत आर्थिक सर्वेक्षण केले सादर; 2023-24 साठी जीडीपी 6.5% राहण्याचा अंदाज

* 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे राष्ट्रवादीत, पक्ष प्रवेशाचं कारण सांगताना म्हणाले, "कलाकारांच्या अडचणी मांडण्यासाठी, मदत-मार्गदर्शनासाठी प्रवेश"

* 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पावित्र्य टिकवण्यासाठी वर्धा पोलिसांचे ‘ऑपरेशन वॉश आऊट’ ; 4 दिवसात 35 लाख रुपयांचा दारूसाठा जप्त

* गेल्या दोन दशकांच्या तुलनेत 2022 मध्ये सर्वाधिक आरोपींना फाशीची शिक्षा,देशातील सत्र न्यायालयांनी  वेगवेगळ्या खटल्यांत तब्बल 165 जणांना सुनावला मृत्यूदंड - अहवाल 

* सचिन तेंडुलकर U-19 महिला संघाचा सन्मान करणार: भारत-न्यूझीलंड तिसऱ्या T20 सामन्यापूर्वी अहमदाबादेत होणार सोहळा     

* बलात्कार प्रकरणी आसाराम बापू यांना जन्मठेपेची शिक्षा 

✍️ *मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या