💥सर्वपक्षिय रिक्षा संघटना कृती समितीचे एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न....!


💥रिक्षा चालकांच्या न्यायीक मागण्यांसह आरटीओ कल्याण मधील भ्रष्ट कारभारा विरोधात रिक्षा संघटना कृती समितीचे केले आंदोलन💥

मुंबई/कल्याण : रिक्षा चालक मालकांच्या न्यायहक्कासाठी प्रमुख मागण्या घेऊन तसेच आर.टी.ओ कल्याण मधील भ्रष्ट कारभाराबाबत निषेध व्यक्त करण्याकरिता सर्वपक्षीय रिक्षा संघटना कृती समिती,डोंबिवलीतर्फे एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.


त्यात प्रामुख्याने कोम्रेड काळू कोमास्कर(लाल बावटा युनियन अध्यक्ष),भाजप प्रणित रिक्षा चालक मालक युनियनचे संजय देसले (कार्याध्यक्ष),दत्ता माळेकर (खजिनदार)महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे तात्यासाहेब माने(अध्यक्ष),संजय मांजरेकर(कार्याध्यक्ष),रिक्षा चालक मालक युनियनचे कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे,उदय शेट्टी (खजिनदार),एकता रिक्षा चालक मालक सेनेचे अध्यक्ष सुदाम जाधव,रिपब्लिकन वाहतूक सेना आनंदराज आंबेडकर गटाचे निमंत्रक (पँथर)आनंद नवसागरे, आरपीआय रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे अध्यक्ष संजय पवार,महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल वलेकर,आदर्श रिक्षा चालक-मालक युनियनचे अध्यक्ष देवराम चव्हाण हे धरणे धरून आंदोलनात उपस्थित होते.सदर आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता शिवसेना शिंदे गटाचे माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक दीपेश पुंडलिक म्हात्रे गोपाळजी लांडगे जिल्हाध्यक्ष राजश्री मोरे माजी नगरसेवक महेश पाटील कल्याण ग्रामीण तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे,नंदू परब शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा ग्रामीण उपप्रमुख प्रकाश म्हात्रे डोंबिवली शहराध्यक्ष विवेक खामकर, ज्येष्ठ साहित्यिक दादाभाऊ अभंग रिपब्लिकन महाराष्ट्र झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष माणिकराव उघडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव,रिपब्लिकन सेनेतर्फे 27 गाव विभाग प्रमुख कल्याण डोंबिवली ग्रामीण विभाग अनंत पारदुले सर, डोंबिवली उपाध्यक्ष अर्जुन दादा जाधव,संघटक नितीन साबळे जिल्हा संघटक ज्ञानेश्वर खडसे,डोंबिवली रिपब्लिकन युवा सेनेचे महासचिव तुषार बनसोडे, संदीप हेलांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक नंदू मालवणकर धुळे डोंबिवली उपाध्यक्ष सुरेश भाऊ कुसाळकर,आम आदमी पार्टीचे प्रियंका पाटील फेरीवाला असोसिएशनचे अध्यक्ष बबन कांबळे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष केणी सर, दीपक भालेराव ज्येष्ठ समाजसेवक, शशी पवार आदींनी पाठिंबा दिला.सकाळी दहा वाजल्यापासून सायं.सहा वाजेपर्यंत शेकडो रिक्षाचालक या आंदोलनात सहभागी झाले होते. सदर आंदोलन सदर आंदोलनास पोलिसांचा मोठा पाऊस फाटा तैनात करण्यात आला होता. सर्व युनियनच्या पदाधिकाऱ्यांची तसेच मान्यवरांची भाषणे झाली. मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या सहा दोन 2023 रोजी वार सोमवारी डोंबिवलीतील तमाम रिक्षा चालक मालकांतर्फे रिक्षा बंद करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.यावेळेस दिवसभरातील निषेधाच्या घोषणानी सारा परिसर दणाणून गेला होता.

* जय शिवराय..! जय भीम...!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या