💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या अपडेट हेडलाईन्स.....!


💥महिलेची छेड काढणाऱ्या औरंगाबादच्या एसीपी विशाल ढुमेंचं अखेर निलंबन💥 

 ✍️ मोहन चौकेकर 

* राज्यातील 1 लाखाहून अधिक तरुणांना रोजगार मिळणार, दावोसमध्ये कोट्यवधींचे सामंजस्य करार

* नाशिक पदवीधर निवडणुकीत कपिल पाटीलांचा सत्यजित तांबे यांना पाठिंबा अखेर सत्यजित तांबे यांनी मौन सोडलं,भाजपमध्ये जाणार ?

* पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान,  त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड निवडणुकीच्या तारखाही जाहीर, मतमोजणी 2 मार्च रोजी 

* मुंबईकरांनो उद्याच्या प्रवासाचं नियोजन आजच करा; पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल, मेट्रो वनची सेवा दोन तासांसाठी बंद, तर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दुपारी 4 ते सायंकाळी 7 दरम्यान वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता 

* हेलिकॉप्टरने परळीत एन्ट्री, कोर्टाकडून 500 रुपयांचा दंड, राज ठाकरें विरोधातील अटक वॉरंट परळी कोर्टाकडून रद्द 

* लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यकर्त्यांना कानमंत्र, भाजप नेत्यांची कानउघाडणी, वेगवेगळ्या सिनेमावरुन वाद निर्माण करणाऱ्या नेत्यांना झापलं 

* लैंगिक शोषणाच्या आरोपांवर बृजभूषण सिंहांनी मांडली बाजू : बृजभूषण सिंहांवर लैंगिक शोषणाचे आरोप ; विनेश फोगाट, साक्षी मलिक यांचं आंदोलन

* महिलेची छेड काढणाऱ्या औरंगाबादच्या एसीपी विशाल ढुमेंचं अखेर निलंबन ढुमें विरोधात नागरिकांमध्ये संताप 

* अजय देवगणच्या 'सिंघम'मध्ये 'सूर्यवंशी' घेणार एंट्री !

* त्र्यंबकनगरीत भरला वारकऱ्यांचा मेळा; पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा, निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक 

* शुभमन गिलनं झळकावलं द्विशतक, 18 चौकार अन् 9 षटकारांचा पाऊस, भारतानं न्यूझीलंडसमोर उभारला 349 धावांचा डोंगर 

* राखी सावंतचा गर्भपात? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

 * पश्चिम महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीवर थंडीचा जोर वाढणार, उत्तरेतून वाहणाऱ्या वाऱ्याचा परिणाम अनेक जिल्ह्यांवर होणार

* जवानांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने C-60 टीमचे जवान करणार भारत यात्रा, मोटरसायकलवरून देशभर विशेष मोहीम

* जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू, फ्रान्सच्या सिस्टर आंद्रे यांचे वय होते 118 वर्षे

* पाकिस्तान दक्षिण आशियातील सर्वात कमकुवत अर्थव्यवस्था असलेला देश, जागतिक बँकेचा अहवाल; पाकिस्तानाकडे 3 आठवड्यांचाच खर्च बाकी

* सुरतमधील हिरे व्यापाऱ्याच्या 9 वर्षाच्या मुलीने घेतला संन्यास, देवांशीने 8 वर्षांच्या काळात 357 दीक्षा दर्शन आणि 500 किलोमीटरचा पायी केला प्रवास

* पंढरपूरला देवदर्शनासाठी जाणारी भाविकांची बस उलटली, सोलापुरातल्या अपघातात 1 ठार, 36 जखमी; सकाळी 6 वाजेच्या सुमारास झाला अपघात

* लाख इलेक्ट्रिक वाहनांची 2022 मध्ये विक्री, यंदा मानवी जीवन बदलून टाकेल तंत्रज्ञानातील संक्रमण

* 'सूर्यवंशम' चित्रपट वारंवार बघून वैतागला एक प्रेक्षक, थेट सेट मॅक्सलाच पत्र लिहून सवाल - आमच्या मानसिक आरोग्याला जबाबदार कोण?

* भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव सापडला वादात, रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राकडून खेळत असताना सामना अर्धवट सोडून रोहित पवारांना भेटला... 

✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या