💥सेलूत तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेत श्री.के.बा.विद्यालय प्रथम...!



[सेलू : येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील परसबागेची पाहणी करतांना गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत,भुजंग थोरे,किरण राऊत,दत्तात्रय रोकडे,मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर,मुख्याध्यापक सुभाष नावकर,संजय धारासुरकर,किशोर खारकर आदी]

💥"प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत" तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेत मिळाला प्रथम क्रमांक💥

सेलू (दि.१९ जानेवारी) - प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेत येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या सेंद्रिय परसबागेस "प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण  योजनेंतर्गत" तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे.

येथील श्री केशवराज बाबासाहेब याबाबत गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत यांच्या पथकाने पाहणी करून शाळेला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना चांगला व ताजा पोषण आहार मिळावा या दृष्टीने शाळांमध्ये परसबाग विकसित करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाने सेंद्रिय परसबाग निर्मिती करून शाळेतील इयत्ता आठवी अ  च्या विद्यार्थी व वर्ग शिक्षक नरेश पाटील यांनी पुढाकार घेऊन यासाठी अथक परिश्रम घेतले.तसेच शाळेतील सेवक विठ्ठल काळे, आण्णासाहेब गायकवाड, ,बाबासाहेब उर्फ बबलू बदाले,सौ.पी.पी. मुंडे यांनी मेहनत घेतली.

यासाठी त्यांना शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर व प्राथमिक विभागाचे सुभाष नावकर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच जेष्ठ शिक्षक पोषण आहार प्रमुख तथा समन्वयक संजय धारासूरकर, बालासाहेब हळणे, सिद्धार्थ एडके यांचे सहकार्य लाभले.

या परसबागेच्या सुरुवातीला रोप खरेदीसाठी शाळेतील शिक्षक बंधू भगिनी यांनी देखील आर्थिक सहकार्य केले आहे तालुकास्तरावर परसबाग स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍड.अनिरुद्ध गोविंदभाऊ जोशी,सचिव महेश वसंतराव खारकर,उपाध्यक्ष डॉ सुनील कुलकर्णी,अभय लक्ष्मीकांराव सुभेदार,जयंत दिग्रसकर,ललित बिनायके,प्रवीण माणकेश्वर, डॉ प्रवीण जोग,विष्णू शेरे,अशोक चामणीकर आदींसह सर्व संचालकांनी अभिनंदन केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या