💥भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेची कार्यशाळा व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न...!


💥यावेळी शिष्यवृत्ती योजनेचे जनजागृती शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते💥

पूर्णा (दि.२३ जानेवारी) : महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क प्रतीपुर्ती योजनेसाठी पात्र अनुसूचित जाती, विजाभज, इमाव तसेच विमान प्रवर्गातील पात्र विदयार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाडीबीटी प्रणाली दिनांक २१.९.२०२२ पासून सुरु झालेली असून ऑनलाईन प्रणालीवर अर्ज नोंदणी व अर्जाची पडताळणी करुन समाजकल्याण कार्यालयाच्या लॉगीन वर अग्रेषित करण्या बाबत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांचे कार्यालयाकडून वेळोवेळी सर्व प्राचार्यांना कळविण्यात आलेले आहे.तथापि मागासवर्गीय पात्र विदयार्थ्यांच्या अर्ज नोंदणी तसेच अर्ज छाननी व पडताळणी करण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने चालू असल्याने या बाबतच्या अडीअडचणीची सोडवणुक करण्यासाठी परभणी तालुक्यातील सर्व महाविद्यालयांची ज्ञानोपासक महाविद्यालय,परभणी येथे दिनांक.१७ जानेवारी २०२३ रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत मा.जिल्हाधिकारी महोदया यांच्या निर्देशान्वये भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे जनजागृती शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते.

बैठकीची सुरुवात बालविवाह प्रतिबंधक शपथ घेऊन करण्यात आली. तद्नंतर श्रीमती गीता गुठ्ठे,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण परभणी यांनी समाज कल्याण विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय विदयार्थ्या करिताच्या सर्व शिष्यवृत्ती योजनांची माहिती उपस्थितांना देऊन योजनेमध्ये येणाऱ्या विविध अडचणीचे निराकरण करुन मार्गदर्शन करुन सन २०२२-२३ मधील मंजुरी अभावी प्रलंबित राहिलेल्या पुढील महाविद्यालयांचा सखोल आढावा घेतला.उपरोक्त महाविद्यालयानी त्यांचे  नमुद अर्ज दिनांक ३० जानेवारी २०२३ अखेर पर्यंत निकाली काढावेत असे आवाहन केले.

 तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने विषयी माहिती देऊन जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. जिल्हयातील सर्व महाविद्यालयां मध्ये समानसंधी केंद्र स्थापन करुन केंद्रामध्ये दरमहा विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परदेशातील उच्च शिक्षणातील संधी, स्पर्धा परिक्षा इत्यादी विषयी माहिती देण्यात यावी असे गीता गुठ्ठे, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, परभणी यांनी बैठकीत सांगीतले. सदर बैठकीस शिष्यवृत्ती निरीक्षक तुषार दवणे आदी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या