💥परभणी जिल्ह्यात महावितरणच्या संपास जोरदार प्रतिसाद.....!


💥अधिकारी-कर्मचार्‍यांनी केले ठिय्या आंदोलन : महावितरणचे दैनंदिन कामकाज ठप्प💥

परभणी (दि.04 जानेवारी) : खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात महावितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात परभणी जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी पूर्णतः सहभागी झाले आहेत. त्यामुळे कंपनीचे दैनंदिन कामकाज बुधवारी म्हणजे पहिल्या दिवशी पूर्णतः कोलमडले.

             महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपन्यातील खाजगीकरणाचे धोरण तातडीने थांबवावे व या तीनही कंपन्यांमधील रिक्त जागा भराव्यात यासह अन्य मागण्यांकरीता अभियंते-अधिकारी संघर्ष समितीच्या कर्मचार्‍यांनी बुधवारपासून बेमुदत संपाचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे या संपात या जिल्ह्यातील अभियंते-कर्मचारी पूर्णतः सहभागी झाले. संतप्त आंदोलनकर्त्यांनी सकाळी 10 वाजता महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडून सरकारी धोरणाचा निषेध केला.

           या आंदोलनात सबोर्डीनेट इंजिनिअर असोसिएशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, म.रा.वि.प. तांत्रीक कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य विद्युत मागासवर्गीय संघटना, महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीकल्स वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी-अभियंता सेना, महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघ, लाईन स्टाफ असोसिएशन वगैरे संघटना सहभागी झाल्या आहेत. या संघटनांच्या प्रतिनिधींनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या