💥शिक्षक मतदारांना मतदान करण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा....!


💥सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त औरंगाबाद यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे💥

परभणी (दि.04 जानेवारी) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून, त्यानुसार सोमवार (दि. 30 जानेवारी) रोजी शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (सा प्र) औरंगाबाद यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा देणे आवश्यक आहे.  निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान दिनांक 30 जानेवारी 2023 (सोमवार) रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत व मतमोजणी दिनांक 02 फेब्रुवारी (गुरुवार) रोजी होणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 23 जून 2011 च्या शासन निर्णयानुसार या निवडणुकीच्या मतदारांना दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजूर करावी. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (सा प्र) औरंगाबाद यांनी कळविले आहे......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या