💥शिक्षकांचे प्रश्न विधान परिषदेत निर्भीडपणे मांडण्यासाठी विक्रम काळे यांनाच पहिल्या पसंतीचे मतदान देवून विजयी करा...!


💥आ.सतिश चव्हाण यांनी पदवीधर मतदारांना केले आवाहन💥

पूर्णा : पुर्णा शहरातील श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात आज मंगळवार दि.१७ जानेवारी रोजी औरंगाबाद शिक्षक मतदार संघांचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.विक्रम वसंतराव काळे यांच्या प्रचारासाठी सहविचार बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीला प्रमुख मागर्दर्शक म्हणुन औरंगाबाद पदवीधर आ .सतिशभाऊ चव्हाण हे उपस्थित होते.


स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड सिनेट पदी निवडुन आलेले प्रा .डॉ .रामेश्वर पवार (व्यवस्थापन) ,प्रा. डॉ .विजय भोपळे (प्राध्यापक सिनेट) प्रा .डॉ .सुरेखा भोसले (विद्या परिषद )प्रा. डॉ .संजय दळवी व प्रा .डॉ .प्रभाकर कीर्तनकार (अभ्यास मंडळ ) यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन आ .सतिशभाऊ चव्हाण यांनी सत्कार केला .

शिक्षकांना मतदानासाठी आवाहन करताना आमदार सतीशभाऊ चव्हाण यांनी शिक्षकांचे प्रश्न विधानपरिषदेत निर्भीडपणे मांडण्यासाठी व सोडवण्यासाठी विक्रम काळे यांना यांनाच पहिल्या पसंतीचे मतदान देऊन प्रचंड मतांनी विक्रमी विजयी करावे असे आवाहन केले सद्या विरोधकांकडे शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी कोणताही उमेदवार सक्षम नाही व त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांची जाण नाही त्यामुळे विक्रम काळे यांना पर्याय नाही त्यामुळे ते विक्रमी मताने निवडुन येतील यात कोणतीही शंका नाही....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या