💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/बातम्या.....!


💥मुंबईकरांना 'शॉक' बसणार ? बेस्टकडून MERC कडे 18 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव💥

 ✍️ मोहन चौकेकर

* ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलेलं ; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट 

* देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याचा कुठलाही प्रयत्न मविआनं केलेला नाही; दिलीप वळसे पाटलांनी फेटाळले सर्व आरोप

* सुशोभीकरण केलंय, पण संध्याकाळी मुंबई आहे की डान्सबार कळत नाही, राज ठाकरेंचा हल्लाबोल

* नाशिकमध्ये पक्षासोबत फसवणूक, आता जास्त खोलवर जायचं नाही,नाना पटोलेंनी तांबे पिता-पुत्रांना सुनावलं   

* काय सांगता ? 'पठाण' एका वेबसाइटवर झाला ऑनलाइन लिक

* शिंदे-फडणवीस सरकारला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा दणका, नांदेडच्या 150 कोटींच्या कामांवरील स्थगिती हटवण्याचे आदेश 

* विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये लागणारे शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र ऐनवेळी बदलल्याने चित्रकार चंद्रकला कदम यांची नाराजी 

* मुंबईकरांना 'शॉक' बसणार ? बेस्टकडून MERC कडे 18 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव

* सार्वजनिक गणेश मंडळांना दिलेल्या मागील वर्षीच्या परवानग्या यंदाही ग्राह्य धरणार, माघी गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेच्या सूचना जारी 

* नाचता येईना....सई ताम्हणकर पुन्हा झाली ट्रोल !

* Emergency सिनेमाचं शुटींग संपताच दीड वर्षांनी कंगनाची Twitter वर वापसी चाहत्यांना  गुड न्यूज देत म्हणाली...20 ऑक्टोबरला रिलीज होणार इमरजन्सी सिनेमा 

* तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित-शुभमनची शतके, पांड्याचंही तुफान अर्धशतक, भारताचं न्यूझीलंडसमोर 386 धावांचं तगडं आव्हान,4 डावात 3 शतकं! शुभमन गिल तुफान फॉर्मात 

* सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून पहिली मेड-इन-इंडिया एचपीव्ही लस लाँच

* वाफगाव किल्ल्याचे राज्य सरकारने जतन करावे:किल्ल्यातील अतिक्रमण काढा; संभाजी ब्रिगेडची पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

* ४ दिवसांसाठी ४० कोटी: डाव्होस दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मित्रपरिवारावर पैसा उडवला? आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

* मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावर सीमाशुल्क विभागानं मोठी कारवाई

* पुणे जिल्हा हादरला! एकाच कुटुंबातील सात जणांची भीमा नदीत आत्महत्या

*अंगणवाडी कर्मचारी २६ जानेवारीपासून बेमुदत संपावर, याआधीही महाराष्ट्र शासनाला दिली होती नोटीस

* गौतमी पाटीलच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता ; कोर्टाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

* महाराष्ट्र केसरीत अन्याय झाल्याने मी डिप्रेशनमध्ये गेलो, स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला होता : चंद्रहार पाटी

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून पहिली मेड-इन-इंडिया एचपीव्ही लस लाँच

* वाफगाव किल्ल्याचे राज्य सरकारने जतन करावे:किल्ल्यातील अतिक्रमण काढा; संभाजी ब्रिगेडची पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

* ४ दिवसांसाठी ४० कोटी : डाव्होस दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मित्रपरिवारावर पैसा उडवला ? आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

* मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावर सीमाशुल्क विभागानं मोठी कारवाई

* पुणे जिल्हा हादरला : एकाच कुटुंबातील सात जणांची भीमा नदीत आत्महत्या

* अंगणवाडी कर्मचारी २६ जानेवारीपासून बेमुदत संपावर, याआधीही महाराष्ट्र शासनाला दिली होती नोटीस

* गौतमी पाटीलच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता ; कोर्टाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

* महाराष्ट्र केसरीत अन्याय झाल्याने मी डिप्रेशनमध्ये गेलो स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला होता : चंद्रहार पाटील

* भारताने न्यूझीलंडला दिले 386 धावांचे टार्गेट ; रोहित-शुभमनचे शतक तर हार्दीकची फिफ्टी

* कर्नाटकातील बंगळुरुमधील उड्डाण पुलावरून पैसे फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल, या पैशांचा पाऊस पाडणाऱ्या व्यक्तीचा पोलीस घेताय शोध

* ऑस्कर पुरस्कार सोहळा : सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत RRR चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला अंतिम नामांकन, मार्चमध्ये ऑस्कर पुरस्कार जाहीर होणार

* मुंबईच्या झवेरी बाजारातून आरोपींनी एका कार्यालयातून 25 लाख रुपये रोख आणि 3 किलो सोने चोरले ; बनावट ईडी अधिकारी असल्याचं भासवत मारला छापा

* गांधी गोडसे एक युद्ध' चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषींना धमक्या ; मुंबई पोलिसांना लिहिलं पत्र, सुरक्षेची केली मागणी

* श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण: श्रद्धा हत्या खटल्यात 6000 पानांचे आरोपपत्र, 100 जणांचे जबाब आणि इलेक्ट्रॉनिक-फॉरेन्सिक पुराव्यांचा समावेश

* पत्नीला पोटगी देण्याचे मोहम्मद शमीला आदेश, प्रत्येक महिन्याला 1 लाख 30 हजार रुपये द्यावे लागतील; 2018 पासून वेगळे राहत असल्यापासून घटस्फोटाची केस सुरू 

* अँड्रॉईड-आयओएस मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमला पर्याय मिळणार, भारताच्या स्वदेशी 'BharOS' मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमची यशस्वी चाचणी

* भोसरी भूखंड कथित घोटाळा प्रकरणी मंदाकिनी एकनाथ खडसे यांना अखेर मोठा दिलासा ; 1 लाखाच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर

* राजधानी दिल्ली-एनसीआरसह, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, नेपाळमधील कालिका येथील काही भागांत भूकंपाचे धक्के, भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल

* धक्कादायक! चंद्रपूर जिल्ह्यात एका वर्षात 241 मुलांचे अपहरण, त्यात 202 मुलींचा व 39 मुलांचा समावेश; 26 मुली, 2 मुलांचा शोध अजूनही सुरू

* फोर्ड कंपनी युरोपमधील 3 हजार 200 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार, सर्वाधिक फटका जर्मनीतील कर्मचाऱ्यांना बसणार

* शेअर मार्केट: आज सेन्सेक्स 37 अंकांच्या वाढीसह  60,978.75 वर तर निफ्टी 0.25 अंकांच्या घसरणीसह  18,118.30 वर बंद

* मी आरोपांना कामानं उत्तर देतो म्हणून यश मिळतं, मुख्यमंत्री होण्यासाठी उठाव केला नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

* विक्की कौशल होणार छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांवर बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवला जाणार 

* घराची 50 टक्के रक्कम भरण्यासाठी दोन महिन्यांची मुदत द्या, बाळकुम प्रकल्पातील विजेत्यांची म्हाडा कोकण मंडळाकडे मागणी

* “जगातील सर्वात मोठ्या पक्षाला नाशिकमध्ये उमेदवार का मिळाला नाही?”, नाना पटोलेंचा भाजपला प्रश्न.....

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या