💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस जिल्हा परिषद सर्कल मधील शिरकळस येथील अनेक शेतकरी पिक विम्यापासून वंचित...!


💥पिकविमा तात्काळ न मिळाल्यास शेतकरी करणार आमरण उपोषण : तहसिलदारांसह कृषी अधिकाऱ्यांना दिले अनेक वेळा निवेदन💥

पुर्णा (दि.२० जानेवारी) - पुर्णा तालुक्यातील ताडकळस जिल्हा परिषद सर्कल मधील शिरकळसह अनेक गावांतील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांसाठी भरलेल्या विम्याचा परतावा अद्यापही पिक विमा कंपन्यांकडून मिळाला नसल्यामुळे अन्नदाता शेतकरी अक्षरशः त्रस्त झाल्याचे निदर्शनास येत असून शिरकळस येथील शेतकरी  मुंजाभाऊ सुभाषराव शिंदे यांच्यासह या परिसरातील अनेक शेतकऱ्यांना २०२२/२३ यावर्षीचा पिक विमा तात्काळ मिळावा याकरिता शेतकरी मुंजाभाऊ भोसले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी तहसिलदार पल्लवी टेमकर यांच्यासह तालुका कृषी अधिकारी रामचंद्र तांबीले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तात्काळ पिक विमा मिळावा या करीता लेखी स्वरुपात निवेदन दिले आहे.

शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी तांबीले व तहसिलदार टेमकर यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा खरीप हंगामातील परतावा अद्यापही न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी या संदर्भात अनेकवेळा तक्रारी दिल्या परंतु यानंतार देखील संबंधित कंपनी प्रशासनासह स्थानिक महसुल व कृषी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या निवेदनाची योग्य दखल घेतली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेवटचा पर्याय म्हणून कुटुंबासह आमरण उपोषणा शिवाय पर्याय राहिला नाही याप्रकरणी स्थानिक प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे जिल्हा कृषी अधिकारी परभणी,जिल्हाधिकारी परभणी,निवासी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तात्काळ पिक विमा मिळवून देण्याची मागणी केली असून संबंधित अधिकाऱ्यांनी देखील निवेदनाची दखल न घेतल्यास कुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा निवेदनात इशारा दिला आहे.

या निवेदनावर मुंजाभाऊ सुभाषराव भोसले,गजानन भोसले,सुभाष भोसले,शकुंतला भोसले,पांडुरंग भोसले,सावित्राबाई अंबुरे,द्रोपदीबाई भोसले आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या