💥पुर्णेतील बसस्थानक रोडवरील भोसले कॉम्प्लेक्स समोरुन अज्ञात चोरट्यांनी पळवली चक्क टाटा सुमो गाडी...!


💥शहरासह तालुक्यातील वाहन मालकांमध्ये खळबळ माजली प्रचंड खळबळ💥


पुर्णा (दि.०७ जानेवारी) - पुर्णा शहरातील बसस्थानक परिसरातील भोसले कॉम्प्लेक्स समोर उभी असलेली टाटा सुमो चारचाकी गाडी चक्क अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना आज शनिवार दि.०७ जानेवारी २०२३ रोजी मध्यरात्री ०१-०० ते पहाटे ०५-०० वाजेच्या दरम्यान सुमारास घडल्यामुळे शहरासह तालुक्यातील वाहन मालकांमध्ये खळबळ माजली असून दुचाकी वाहन चोरी प्रमाणेच आता शहरासह तालुक्यात चारचाकी वाहन चोरीच्या घटनाही घडू लागल्यामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे.

या घटने संदर्भात सविस्तर माहिती अशी की शहरातील बसस्थानक रोडवरील भोसले कॉम्प्लेक्स येथे आपल्या कुटुंबासह किरायाने राहणारे आकाश साहेबराव गोडबोले यांनी आपली टाटा सुमो कंपनीची गाडी क्र.एम.एच २६ ए.एफ २९६६ ही गाडी पुर्णा येथील कल्यान टोल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.येथे मासिक भाडे करार करुन लावलेली होती सदरील गाडी ते स्वतः चालक/मालक असल्यामुळे त्यांनी नेहमी प्रमाणे घरी आल्यानंतर ते राहत असलेल्या भोसले कॉम्प्लेक्स समोर उभी केली परंतू सकाळी उठल्यानंतर गाडी घरासमोर नसल्यामुळे त्यांनी बरीच शोधाशोध केल्यानंतर कल्यान टोल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.यांच्याशी संपर्क करून गाडी आपण घेऊन गेलात काय अशी विचारणा केली असता संबंधित कंपनीने गाडी नेली नसल्याचे त्यांना कळाल्यानंतर आपली गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांना निदर्शनास आल्यानंतर त्या पुर्णा पोलिस स्थानकात जाऊन गाडी चोरी गेल्याची रितसर फिर्याद दिल्याने पुर्णा पौलिस प्रशासनाने सायंकाळी उशीरा ०५-०० वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपी विरोधात कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या