💥परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्मा दिनानिमित्त आदरांजली...!


💥आज दि.30 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटांचे मौन (स्तब्ध) पाळून आदरांजली वाहण्यात आली💥

परभणी (दि.30 जानेवारी) : भारतीय स्वातंत्र्य संग्रामात प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटांचे मौन (स्तब्ध) पाळून आदरांजली वाहण्यात आली.

जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्रीमती स्वाती दाभाडे, डॉ. सुशांत शिंदे, निवृत्ती गायकवाड, डॉ. अरुण जऱ्हाड, जिल्हा नियोजन अधिकारी संजय परदेशी, नायब तहसीलदार नानासाहेब भेंडेकर यांच्यासह अधिकारी/कर्मचारी यावेळी उपस्थित होते......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या