💥शिक्षक मतदारसंघात राजकिय पक्षांचा शिरकाव धोकादायक - यशवंत मकरंद


💥मराठवाडा शिक्षक संघाचे अधिकृत ऊमेदवार सुर्यकांत विश्वासराव यांच्या प्रचार कार्यालयाच्या ऊदघाटन प्रसंगी ते बोलत होते💥

परभणी (दि.०४ जानेवारी) : शिक्षक मतदार संघात राजकिय पक्षांनी शिरकाव केल्या मुळे शिक्षक मतदारसंघाच्या मुळ संकल्पनेशी प्रतारणा होत आहे अशी भुमिका मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद यांनी व्यक्त केली. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातील मराठवाडा शिक्षक संघाचे अधिकृत ऊमेदवार सुर्यकांत विश्वासराव यांच्या प्रचार कार्यालयाचे ऊदघाटन ऊघडा महादेव परिसरात करतांना ते बोलत होते या वेळी ऊदघाटकस्थानी एम.बी.जाधव तर अतिथीस्थानी प्रा.डाॅ.कन्हैया पाटोळे ऊपस्थित होते.

या वेळी बोलतांना एम.बी.जाधव यांनी  शिक्षक संघटनेने संघर्षातुन मिळवलेल्या सुविधा सत्ताधिशांनी काढुन घेतल्या आहेत असा घणाघात केला तर प्रा.डाॅ.कन्हैया पाटोळे यांनी  शिक्षक प्राध्यापकांच्या न्याय हक्कांचा आवाज बुलंद करण्यासाठी मराठवाडा  शिक्षक संघटनेचे ऊमेदवार सुर्यकांत विश्वासराव यांना समर्थन देण्याची गरज प्रतिपादित केली.

या ऊदघाटन सोहळ्यात एन.टी.कदम,निशांत हाके,डाॅ.सुनिल जाधव,प्रभाकर जाधव,दिगंबर देवकते,कैलास राठोड,बी.जी.राठोड,तुकाराम गरुड यांनी मनोगत व्यक्त केले.या सोहळ्यास शिक्षक मोठ्या संख्येने ऊपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या