💥पुर्णा तालुका क्रिडा समिती कडून श्री गुरुरुबुद्धीस्वामी महाविद्यालय मैदानावर कब्बडी संगीत खुर्ची स्पर्धा संपन्न...!


💥प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून क्रिडा स्पर्धांचे करण्यात आले होते आयोजन : 14 संघांनी घेतला स्पर्धेत भाग💥

पुर्णा (दि.२८ जानेवारी) - पुर्णा तालुका क्रीडा समितीच्या वतीने येथिल श्री गुरुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त कब्बडी संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत मुले व मुली च्या 14 संघाने भाग घेतला यामध्ये भारत मातेच्या देखावा सादर करण्यात आला होता.


      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.गोविंदराव कदम,उद्घाटक म्हणून राजेश मुंदडा, प्रमुख पाहुणे माजी जिल्हाप्रमुख सुधाकर खराटे, पप्रमुख उपस्थिती  प्रकाश बनाते मुन्ना राठोड मुंजा कदम मोहन गुंजकर तालुका क्रीडा समितीचे कार्याध्यक्ष संजय कदम अध्यक्ष श्रीहर घुले उपाध्यक्ष राजेश शहाणे सचिव सचिन डहाळे कोषाध्यक्ष मारुती मेघमाळे कार्यकारी प्रमुख,रवि बिछडे,अजय वाघमारे, सोनू बहोत  रमाकांत कदम ,शिवप्रसाद ठाकूर , रमेश घोरपडे,अनिकेत मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून या स्पर्धा घेण्यात आल्या आल्या यामध्ये प्रथम क्रमांक पूर्णा फलटण या संघाने मिळवला संघाचे कर्णधार गजानन वैद्य हे होते द्वितीय क्रमांक महाकाल या संघाने मिळवला या संघाचा कर्णधार रमेश घोरपडे तसेच मुलींच्या गटात एकता कबड्डी संघ पूर्णा या संघाने मिळवला या संघाची कर्णधार दर्शना शहाणे तर द्वितीय येण्याचा मान कस्तुरबा गांधी विद्यालय संघाने मिळवला तसेच संगीत खुर्ची मध्ये प्रथम समृद्धी सूर्यवंशी द्वितीय अंगा   भिसे तृतीय राधिका काटकर लहान गट मुली प्रथम वेदिका कदम द्वितीय अक्षरा भिसे तृतीय अक्षरा नवघरे तसेच मुलांच्या गटात आदित्य इंगोले प्रथम रितेश सूर्यवंशी द्वितीय लक्ष्मीकांत वसमतकर तृतीय या सर्व खेळाडूंनी यश संपादन केले सूत्रसंचालन पाराशर स्वामी यांनी उर्वरित लंगडी स्पर्धा दोन मार्च 2023 रोजी सकाळी ठीक दहा वाजता गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णा येथे आयोजित करण्यात आली आहे तरी जास्तीत जास्त खेळाडू या स्पर्धेत सहभाग घ्यावा या स्पर्धा मुले व मुली या दोन गटात होणार आहे 

 असे असे आव्हान क्रीडा संयोजक सज्जन जयस्वाल यांनी केले आहे स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी विवेक कॉम्प्युटर पूर्ण येथे आपले नाव नोंदणी करावी किंवा 99 22 870 570 या नंबर वर आपले नाव नोंदणी करावी स्पर्धा सकाळी ठीक दहा वाजता गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णा येथे सुरू होतील....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या