💥वसतिगृहातील विद्यार्थिनी कु विजया पवार हिने पुढाकार घेऊन सूर्यनमस्कार संचालन केले💥 परभणी (दि.२८ जानेवारी) - परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सावित्रीबाई फुले मुलींचे वस्तीगृहा मध्ये इज शनिवार दि.२८ जानेवारी रोजी जागतीक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात रथसप्तमी चे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला. वसतिगृहातील विद्यार्थिनी कु विजया पवार हिने पुढाकार घेऊन सूर्यनमस्कार संचालन केले सर्व मुलींनी भरभरून प्रतिसाद दिला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु दुर्गा, अनुराधा,शितल,मयुरी,दक्षता सिध्दी,समृद्धी यांनी प्रयत्न केले. हा कार्यक्रम कृषि महाविद्यालय, वनामकृवि परभणी चे प्राचार्य डॉ सय्यद इस्माईल , वसतिगृह मुख्य अधीक्षक डॉ राजेश कदम आणि वसतिगृह सहायक अधिक्षक डॉ गोदावरी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
0 टिप्पण्या