💥जिंतूर तालुक्यातील चांदज येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन....!

 


💥येथील मोठा मारुती मंदिर जवळ 'अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद संगीत भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळाचे आयोजन💥

जिंतूर  प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तालुक्यातील चांदज येथे दि. २८ पासून 'अखंड हरिनाम सप्ताहचे' श्रीमद संगीत भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चे आयोजन चांदज येथील मोठा मारुती मंदिर जवळ आयोजित करण्यात आले आहे.

             चांदज येथील मोठा मारुती मंदिर जवळ अखंड हरिनाम सप्ताहाला आरंभ दि. २८ जानेवारी पासून सुरू होणार आहे. दि. ४ फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात विविध कीर्तनकार सेवा देणार आहेत. भागवताचार्य श्री.ह.भ.प गणेशानंद महाराज( परळीकर ) कथा सांगणार आहेत. श्रीहरी महाराज चांदजकर संहिता वाचक करणार आहे. दररोज काकडा आरती, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण आणि गाथा भजन, भागवत कथा, हरिपाठ होणार आहे. दररोज सायंकाळी ८ ते १० वाजण्याच्या  दरम्यान प्रसिद्ध कीर्तनकार यांचे कीर्तन होईल. या सप्ताहामध्ये ह.भ.प छगन महाराज टाकळीकर, ह.भ.प रमेश महाराज जोगवाडकर, ह.भ.प राधेश्याम महाराज खरबळ पाटील, ह.भ.प संभाजी महाराज काकडे, ह.भ.प मारुती महाराज दांगट, ह.भ.प संतोष महाराज पठारे, ह.भ.प गोविंद महाराज मुंडे यांचे दररोज रात्री ८ वाजता कीर्तन आयोजित केले आहे.

           सप्ताहाचा समारोप शनिवार दि. ०४ रोजी काल्याचे कीर्तन सकाळी ११ ते १ श्री ह भ प गणेशानंद महाराज यांचे होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे कार्यक्रम होणार असून या अखंड हरिनाम सप्ताह पंचकोशातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आव्हान आयोजक तुकाराम माणिकराव अंभोरे पाटील व  चांदजकर यांच्या वतीने करण्यात आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या