💥राज्याचे माजी मंत्री आ.धनंजय मुंडेंच्या हस्ते नाथरा येथील मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन होणार...!


💥रत्नपारखी डॉ.एकनाथराव मुंडेंच्या संकल्पनेतून परळी वैजनाथ पंचक्रोशीतील वाचकांना मिळणार साहित्यिक मेजवानी💥


💥श्रीनाथ मानव सेवा मंडळातर्फे ४ जानेवारी रोजी आयोजित केले जाणार सहावे मराठी साहित्य संमेलन💥

💥संमेलनात विविध पुरस्कारांचे केले जाणार वितरण💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) श्रीनाथ मानव सेवा मंडळ  यांच्या वतीने सहावे मराठी साहित्य संमेलन दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय नाथ्रा येथे होणार आहे. रत्नपारखी डॉ. एकनाथराव मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी वैजनाथ पंचक्रोशीतील वाचकांना साहित्यिक मेजवानी मिळणार आहे.

या साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे या राहणार आहेत. तर युवा साहित्यिक, कवी दंगलकार डॉ. स्वप्नील चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रातील मान्यवर मसाप मराठवाड्याचे सदस्य दगडू लोमटे, ज्येष्ठ साहित्यिक अमर हबीब, जि. प. गटनेते अजय मुंडे, संस्थेचे सचिव डॉ. संतोष मुंडे, सरपंच अभय मुंडे तथा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती विशेष व्यक्तिमत्त्वांचा विविध पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या