💥पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी ते कंठेश्वर या मार्गावरील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाची गुत्तेदाराने लावली वाट...!


💥मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत होणारे १ कोटी २६ लाख ५६ रुपयांच्या रस्त्याचे काम अद्यापही खोदकाम करीत अर्धवटच💥


परभणी/पुर्णा (दि.३० जानेवारी) - पुर्णा तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत ग्रामीण भागांमध्ये कोट्यावधी रुपयांच्या शासकीय निधीतून होणारी रस्त्यांची कामे कालावधी उलटल्यानंतर देखील अपूर्ण व निकृष्ट दर्जाची होत असल्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था परभणी या कार्यालयात कार्यरत कार्यकारी अभियंता वाघ उपविभागीय अभियंता बिचेवार कनिष्ठ अभियंता कुलकर्णी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत असून असाच काहीसा प्रकार पुर्णा तालुक्यातील रा.मा.२४९ धनगर टाकळी ते कंठेश्वर या कि.मी.०/०० ते कि.मी.२/७०० या एकून लांबी २.७० किलोमीटर डांबरी रस्ता व २.४० किलोमीटर सिमेंट काँक्रीट रस्ता ३०० मिटर या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील १ कोटी २६ लाख ५६ हजार रुपयांच्या शासकीय निधीतून होणाऱ्या रस्त्याच्या कामाला १८ आगस्ट २०२१ रोजी सुरुवात झाली असून हे काम पुर्ण करण्याचा कालावधी १७ फेब्रुवारी २०२३ दर्शवण्यात आला असला तरीही सदरील रस्त्याचे काम कालावधी संपण्यासाठी अवघे १९ दिवस बाकी असतांना सदरील अद्यापही २५% देखील पुर्ण झाला नसल्याचे निदर्शनास येत आहे.


पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी ते कंठेश्वर या मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत होत असलेल्या रस्त्याच्या कामाचे कंत्राटदार व्हि.टी.पाटील इंजिनिअर्स ॲन्ड कॉन्ट्रंक्टर औरंगाबाद हे असले तरी सदरील कामावर देखरेख मात्र एका स्थानिक गुत्तेदाराची असल्यामुळे या रस्त्याची संपूर्णतः वाट लागल्याचे निदर्शनास येत असून सदरील रस्त्याचे काम अंदाजपत्रका प्रमाणे नकरता हा रस्तावरील व आसपासचे मटेरीयल जेसीबी द्वारे उखरून जागेवरच दाबण्याचा प्रकार होत असल्यामुळे या मार्गावर सातत्याने वाहणांचे अपघात होतांना पाहावयास मिळत असून गावकऱ्यांना या मार्गावरून प्रवास करतांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत असून याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे कंठेश्वर बसस्थानक ते मा.तंटामुक्ती अध्यक्ष नरहरी कदम यांच्या घरापर्यंत ३०० मिटर होत असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम देखील अत्यंत दर्जाहीन व संपूर्णतः अर्धवट असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या