💥महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर.....!


💥३१ पोलिसांना 'शौर्य पोलिस पदक तर ३९ अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना 'गुणवंत पोलिस पदक' जाहीर💥                     

✍️ मोहन चौकेकर

प्रजासत्ताक दिनानिमित्त ९०१ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी १४० पोलीस कर्मचाऱ्यांचा शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. तर ९३ पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलं आहे. याशिवाय गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ६६८ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर झाले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील ३१ पोलिसांना शौर्य पोलीस पदक जाहीर झाले आहे. तसेच, चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि ३९ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना गुणवंत पोलीस पदक जाहीर झाले आहे.मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक संभाजी देशमुख आणि ठाण्यातील उपनिरीक्षक दीपक जाधव या चार अधिकाऱ्यांचा राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेल्यांमध्ये समावेश आहे. याशिवाय नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर यांना गुणवंत पोलीस पदक जाहीर झाले आहे. याशिवाय परिक्षेत्रातील सुखदेव मुरकुटे यांनाही गुणवंत पोलीस पदक जाहीर झाले आहे.


ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, त्या १४० कर्मचाऱ्यांपैकी ८० जण हे डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या, दहशतग्रस्त भागात सेवा बजावणारे आहेत. शौर्य पदक प्राप्त करणाऱ्यांमध्ये सीआरपीएफचा अव्वल क्रमांक असून त्यांनी ४८ पदके मिळवली आहेत. तर महाराष्ट्राने ३१ पदके मिळवली आहेत.जम्मू-काश्मीर -२५, झारखंड -९, दिल्ली, छत्तीसगड, बीएसएफचे सात-सात जवान आहेत. उर्वरित जवान अन्य राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि सीएपीएफचे आहेत. याशिवाय, ५५ जवानांना होमगार्ड व सिविल डिफेंस मेडलने सन्मानित करण्यात आलं आहे. हे शौर्य पदक होमगार्ड आणि नागरिक सुरक्षेसाठी जवानांच्या शौर्यासाठी दिले जाते. उत्कृष्ट सेवा आणि नागरी संरक्षणासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते विशिष्ट सेवा आणि नागरी संरक्षण पदक प्रदान केले जाते. हे पदक ९ जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी आणि ४५ जवानांना नागरी संरक्षणासाठी दिले जाते......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या