💥जिंतुर तालुक्यातील सोस ग्रामपंचायतवर भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद वर्चस्व...!


💥भाजपाचे मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतरावजी शिंदे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचितांचे स्वागत💥

जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी.रामपूरकर

जिंतुर तालुक्यातील सोस ग्रामपंचायत उपसरपंच  पदाची निवड करण्यात आली.याप्रसंगी श्री.संजय सोनवणे शाखाअभियंता लघु सिंचन उपविभाग जिंतुर,श्री.बि.आर पाटील क्रुषि अधिकारी पं.स.जिंतुर,श्री.कापुरे ग्रामसेवक सोस यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली.

भाजपाचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतरावजी कुंडलिकरावजी शिंदे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचितांचे स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सोस येथील ग्रामपंचायत ही अतिशय चुरशीची झाली होती. सोस ग्रामपंचायत  अंतर्गत  सरपंच पदासाठी एकुण ५ उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते .त्यापैकी माणिकराव  संतोबा शिंदे हे घवघवित मतांनी विजयी झाले.तर विजय झालेले सदस्य आशामती संतोष कुमार शिंदे राजाभाऊ रामराव शिंदे भगवान चंद्रकांत पाटील  इंदुमती पिराजी गडले मिराबाई लहुजी सुरवसे, नवनिर्वाचित सदस्द आज दि.०३-०१-२०२३ रोजी उप  सरपंच पदाची निवड करण्यात आली.उपसरपंच म्हणुन श्री.राजाभाऊ रामराव शिंदे याची बिनविरोध निवड करण्यात आली.

    याप्रसंगी माजी उपसरपंच जानकिराम शिंदे आ,भा, जिंतूर ता, अध्यक्ष गुलाबराव शिंदे पत्रकार महादेव शिंदे  माजी उपसरपंच संतोष शिंदे तसेच गावातील प्रतिष्ठ नागरिक, प्रकाशराव शिंदे,सुभाषराव शिंदे,अशोकराव शिंदे,रामेश्वर शिंदे,दिलीपराव शिंदे,ज्ञानेश्वोर शिंदे ,सुनिलराव  शिंदे बाबारावराव शिंदे रामेश्वर शिंदे सुधाकर गडले मुंजाभाऊ शिंदे पिराजी गंडले आदी गावकरी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या