💥महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जिंतूर आगारात सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन......!


💥यावेळी आगार प्रमुख विश्वनाथ चिभडे यांनी आगारातील सर्व चालकांना सुरक्षित वाहतुकीसाठी माहिती दिली💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी. रामपूरकर

जिंतूर आगार येथे आज बुधवार दि.11 जानेवारी रोजी सकाळी 11-०० वाजता सुरक्षितता अभियान सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आगार प्रमुख विश्वनाथ चिभडे यांनी आगारातील सर्व चालकांना सुरक्षित वाहतुकीसाठी माहिती दिली व सर्व राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना सुरक्षित प्रवाशी वाहतुकीच्या जबाबदाराची जाणीव निर्माण करण्यासाठी सूचना दिले सुरक्षित वाहतुकीसाठी ठरवून दिलेल्या कार्यपद्धती पाडण्यासाठी भर देणे हे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

         या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार माजिद भाई व गुलाबराव शिंदे हे उपस्थित होते. तू कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आगार प्रमुख विश्वनाथ चिभडे होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिपिक घुगे यांनी केले.

त्यावेळी वरिष्ठ लिपिक प्रल्हाद मुंडे, लिखे, गुहाळे, लेखपाल पांचाळ, लिपिक मदन मुंडे, मेहबूब शेख, गीते बाई, चालक मोरे, कुटे, ठाकरे, दराडे, भुजबळ, पठाण, घुगे, राठोड, घुले आदी चालक-वाहक, तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या