💥बाळासाहेबाची शिवसेना पक्षाच्या नांदेड दक्षिण उपशहर प्रमुख पदावर लड्डूसिंघ काटगर यांची नियुक्ति...!


💥संपर्क प्रमुख मा.आनंद जाधव यांच्या आदेशाने करण्यात आली नियुक्ती💥


नांदेड (दि.16 जानेवारी) :  मा.मुख्यमंत्री ना.एकनाथ जी शिंदे यांच्या द्वारे स्थापित बाळासाहेबाची शिवसेना पक्षाच्या नांदेड दक्षिण उप शहर प्रमुख पदावर सक्रिय सामाजिक कार्यकर्ता स. लड्डूसिंघ काटगर यांची नुक्तीच नेमणूक करण्यात आली आहे. संपर्क प्रमुख मा.आनंद जाधव मा.खासदार श्री हेमंत पाटिल जी, मा. आमदार श्री बालाजीराव कल्याणकर यांच्या आशीर्वादाने आणि उप जिल्हा प्रमुख श्री बिल्लू यादव, शहर प्रमुख तुलजेश यादव, हेमंत पाटिल मित्र मंडळाचे प्रमुख गुरमीत सिंघ टमाना यांच्या सहकार्याने नियुक्तिची प्रक्रिया पार पडली.


उपशहर प्रमुख पदावर नियुक्तीनंतर मित्र-परिवाराच्यावतीने स. लड्डूसिंघ काटगर यांचा गुरुद्वारा गेट नंबर दोन ठिकाणी जल्लोषात सत्कार करण्यात आला. यावेळी स. हरदीपसिंघ हजुरिया, स. राजिंदरसिंघ टमाना, स. सरबजीतसिंघ संधू, स. त्रिलोचनसिंघ बिट्टू, स. लक्कीसिंघ कामठेकर, स. दर्शनसिंघ कडेवाले, स. बलजीतसिंघ शाहू, स. नरेंद्रपालसिंघ टमाना, स. केहरसिंघ सह मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या