💥महाराष्ट्रात राज्यात लवकरच गोसेवा आयोगाची होणार स्थापना....!

 


💥राज्य सरकार करतेय गांभीर्याने विचारमंथन : मुहूर्त स्वरुप येणार💥

गोमातेचे संरक्षण आणि संवर्धन चळवळीला बळकटी मिळावी म्हणून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारनेसुध्दा गोसेवा आयोगाच्या स्थापनेसंदर्भात गांभीर्याने विचार विनिमय सुरु केला आहे. लवकरच गोसेवा आयोगाच्या स्थापनेस मुहूर्त स्वरुप लागेल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

          गो विज्ञान संशोधन संस्था पुणे, दादरा नगर हवेली मुक्ती संग्राम समिती व गोसेवा समिती अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार 2023 चे वितरण नुकतेच करण्यात आले. त्याप्रसंगी राज्याचे पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या बाबत सुतोवाच केले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्‍चिम विभागाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, भारतीय किसान संघाचे क्षेत्रीय संघटनमंत्री दादा लाड, गो विज्ञान संशोधन संस्थेचे राजेंद्र लुक्कड, बाळासाहेब जांभूळकर व गोसेवा समिती महाराष्ट्र प्रांतचे संयोजक चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉ. सुनील कराड आदी उपस्थित होते.

           याप्रसंगी विखे यांनी मोरोपंत पिंगळे यांनी ज्या विचाराने सुरु केलेली चळवळ ही लोकाभिमुख ठरत आहे. गोमातेकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातूनच पाहण्याचा पिंगळे यांनी दिलेला मूलमंत्र या चळवळीचे वैचारिक अधिष्ठान ठरत असल्याचे नमूद केले. भारतीय संस्कृती आणि परंपरेत गोमातेचे महत्व आता सेंद्रीय शेतीच्या दृष्टीनेसुध्दा महत्वपूर्ण ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंद्रीय शेतीच्या चळवळीला पाठबळ द्यावयाची भूमिका घेतली. राज्य सरकारद्वारेही प्रसार आणि प्रचार सुरु आहे. गोमातेच्या संरक्षणाची आणि संवर्धनाची चळवळसुध्दा निश्‍चितच बळकट करण्याकरीता सर्वार्थाने प्रयत्न केले जातील, असा विश्‍वास व्यक्त केला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या