💥पुर्णा तालुक्यातील माखणी येथे राजमाता जिजाऊ जयंती निमित्त बाल आनंद नगरी संपन्न....!


💥शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजीराव आवरगंड यांनी आनंद नगरीचे उद्घाटन फित कापून केले मान्यवरांच्या💥


पुर्णा (दि.13 जानेवारी) - पुर्णा तालुक्यातील माखणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत काल दि.12 जानेवारी 2023 रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त बाल आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन गावचे सरपंच आवरगंड व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजीराव आवरगंड करण्यात आले त्यानंतर आनंदनगरीचे उद्घाटन फीत कापून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त अबोली आवरगंड, भावना आवरगंड व तेजस्विनी आवरगंड यानी समोचित भाषणे केली.आनंद नगरीचा उद्देश व आयोजनाबद्दल श्री.सुरज पौळ सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर सौ.मीराताई आवरगंड यांना "प्रभावती गौरव पुरस्कार" मिळाल्याबद्दल त्यांचे पती श्री जनार्धन आवरगंड यांचा प्रातिनिधिक सत्कार गावचे सरपंच श्री.गोविंदराव आवरगंड यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.आनंद नगरीतील दोन चांगले पदार्थ बनवणा-या कु.तुषार गाडे व कु.पुरूषोत्तम आवरगंड या दोन्ही विद्यार्थ्यांना श्री जनार्दन आवरगंड यांनी प्रत्येकी 101 रूपये  बक्षीस दिले.या बाल आनद नगरीमध्ये खाद्य पदार्थांचे एकूण 60 स्टॉल होते.विद्यार्थांनी अतिशय रुचकर पदार्थ बनवले होते याचा सर्व गावक-यांनी मनमुराद आनंद घेतला.गावक-यांचा उदंड प्रतिसाद या आनंद नगरीला लाभला.सर्व विद्यार्थांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपले स्टॉल लावले व आपल्या पदार्थांची विक्री केली.या आनंद नगरीमध्ये प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री.संजयकुमार जोशी ,राजकुमार ढगे,सुरज पौळ ,सुनिल शेळके,गजानन पवार, राम महाजन ,सौ.ज्योती झटे यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या