💥पुर्णेत स्वच्छतेचे दुत संत गाडगेबाबाच अस्वच्छतेच्या गराड्यात 'संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान कागदोपत्रिच'....!


💥नगर परिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शहरातील नांगरीकांचे 'स्वच्छ शहर सुंदर शहराचे' स्वप्त भंगले💥


पुर्णा (दि.१७ जानेवारी) - महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी रुपयांचा शासकीय निधी राज्यातील ग्रामपंचायत/नगर पंचायत/नगर पालिका/महानगर पालिकांच्या माध्यमातून उपलब्ध करुन देऊन गाव खेड्यापासून ते शहरांपर्यंत स्वच्छतेचे दुत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या नावाने संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियानाची सुरुवात केली परंतु अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियानाची संपूर्णपणे वाट लागल्याचा प्रकार पुर्णा शहरात पाहावयास मिळत असून शहरातील विविध वसाहतींमध्ये स्वच्छते अभावी अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरल्याचे निदर्शनास येत आहे.


याही पेक्षा गंभीर बाबा म्हणजे नगर परिषद इमारतीच्या आसपासचा परिसरात देखील स्वच्छते अभावी अस्वच्छता पसरल्याचे निदर्शनास येत असून नगर परिषद इमारतीच्या दक्षिणेस कंम्पाऊंड वॉलवर संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियानाची जाहीरात रंगवण्यात आली असून यावर स्वच्छतेचे दुत संत गाडगेबाबा यांचा फोटो देखील रंगवण्यात आला असून या जाहीरात केलेल्या कंम्पाऊंड वॉलच्या आसपास अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरले असून या ठिकाणी लोक लघुशंका देखील करत असल्यामुळे पुर्णा नगर परिषद प्रशासनाने तात्काळ स्वच्छता मोहीम राबवून शहरासह नगर परिषदेच्या आसपासचा परिसर देखील तात्काळ स्वच्छ करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रताप कदम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीच्या वतीने विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष हर्षद कापूरे यांच्या वतीने प्रभारी मुख्याधिकारी कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या