💥पुर्णा तालुक्यातील महातपुरी येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला मेळावा संपन्न.....!


💥ग्रामपंचायत सरपंच सौ.मुक्ताताई कदम यांची प्रमुख उपस्थिती💥

पुर्णा (दि.०४ जानेवारी) - तालुक्यातील महातपुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी व राष्ट्रीय महिला मुक्ती दिन खांबेगाव- महातपुरी ग्रुप ग्रामपंचायतच्या आदर्श सरपंच सौ मुक्ताताई गजानन कदम यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महातपुरी येथे दिनांक 3 जानेवारी 2023 मंगळवार रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श सरपंच सौ मुक्ताताई गजानन कदम ,उद्घाटक मा. श्री भगवंत देसाई देशपांडे जेष्ठ नेते भाजपा, प्रमुख अतिथी मा. श्री विनोदकुमार कनकुटे, केंद्रप्रमुख, गजानन कदम, उपसरपंच सौ.इंदुबाई एडके, सुरेश लोखंडे मुख्याध्यापक एकुरखा,मुख्याध्यापक नारायण सुरेवंशी,पोलीस पाटील राम कस्तुरे, रामप्रसाद सावकार ,ग्रामसेवक  सौ.संगीता ससाने, शेषेराव मोहीते, गावातील सर्व महिला वर्ग,विशेष उल्लेखनीय बाब शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत उपस्थिती लावली.विद्यार्थी -विद्यार्थीनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व उपस्थित पाहुणे मंडळी व गावातील सर्व उपस्थित महिला यांचे या ठिकाणी स्वागत सत्कार करण्यात आले. केंद्रप्रमुख विनोद कनकुटे, व सरपंच सौ मुक्ताताई कदम,आदर्श शिक्षक विष्णुपंत परडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.पवन परडे यांच्या वाढदिवसानिमित्त विष्णुपंत परडे तर्फे सर्व विघ्यार्थांना टाय व बेल्ट आणि सरपंच यांच्यातर्फ पेन चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री विष्णुपंत परडे कळगावकर यांनी केले शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाम कस्तुरे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष कुंडलिक सोनकांबळे, दिलीप जंगले,माधव एडके,रमजान शेख,आदर्श शिक्षक विष्णुपंत परडे, सुरेश भरारे व इतर तरुण वर्गांणी पुढाकार घेऊन कार्यक्रम संपन्न केला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या