💥परभणी जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील तळपता सुर्य प्रा.डॉ.सुरेश कदम यांना राज्यस्तरीय पुरस्कार....!


💥अभिमानास्पद : साहित्य क्षेत्रात अल्पावधीत आपल्या कर्तृत्वाची छाप पाडणारे प्रा.डॉ.सुरेश कदम हे पुर्णेचे भुमीपुत्र💥 


परभणी जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप टाकणारे पुर्णेचे भुमीपुत्र प्रा.डॉ.सुरेश कदम यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने अल्पावधीतच साहित्य क्षेत्रातील तळपता सुर्याप्रमाणे आपली ओळख निर्माण केली असून अखिल भारतीय साहित्य मंडळाने त्यांच्या साहित्यासह त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांची सावित्रीबाई फुले साहित्य भुषण राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे.


पुर्णेचे भुमीपुत्र असलेले प्रा.डॉ.सुरेश कदम यांना हा मानाचा सावित्रीबाई फुले साहित्य भुषण राज्यस्तरीय पुरस्कार येत्या २९ जानेवारी २०२३ रोजी परभणी येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार आहे.पुर्णा तालुक्यातील नव्या पिढीतील प्रख्यात लेखक प्रा.डॉ.सुरेश कदम यांनी भटक्या विमुक्तांची आत्मकथने आकलन आणि आस्वाद या पुस्तकांचा प्रस्थाव सादर केला होता त्यांच्या या पुस्तकास हा पुरस्कार जाहीर करण्यात आला प्रा.डॉ.सुरेश कदम यांची सावित्रीबाई फुले साहित्य भुषण राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे जेष्ठ समाजसेवक तथा जेष्ट आरोग्य तज्ञ डॉ.दत्तात्रय वाघमारे,प्रा.मोहन मोरे,जेष्ठ रिपाई नेते प्रकाश कांबळे,छत्रपती संभाजी महाराज विद्यालय सुहागणचे या संस्थेचे अध्यक्ष हिराजी भोसले,श्री गुरुबुध्दी स्वामी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रमोद सितारामअप्पा एकलारे प्रा.गोविंद कदम,अभिनव विद्या विहार प्रशाला या संस्थेचे अध्यक्ष आनंद सेठ अजमेरा,ॲड.रोहिदास जोगदंड,नगरसेवक ॲड.राजेश भालेराव,नगरसेवक ॲड.हर्षवर्धन गायकवाड,शिवसेना शहर प्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रताप कदम,भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मीकांत उर्फ बाळू भिमराव कदम,नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांचे प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक संतोष एकलारे,युवा उद्योजक नितीन कापसे,शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम,दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी तथा कला क्षेत्रातिल जेष्ठ साहित्यिक आदर्शवादी शिक्षक जगदीश जोगदंड,जेष्ठ पत्रकार विजय बगाटे,जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स वेब वृत्तवाहीनीचे संपादक/संचालक चौधरी दिनेश,पुर्णा तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दौलत भोसले,शहराध्यक्ष केदार उर्फ बाळु पाथरकर,पत्रकार मुजीब कुरेशी,पत्रकार अनिस बाबुमियाँ आदींनी अभिनंदन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या