💥महाराष्ट्र प्रदेश भिक्खु संघाची बैठक पुर्णेतील बुध्द विहारात संपन्न....!


💥प्रदेश महासचिव पु.भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते बैठकीचे आयोजन💥

पुर्णा (दि.०७ जानेवारी) - येथील बुध्द विहार येथे काल  गुरुवार दि.०५ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र प्रदेश भिक्खु संघाची लातुर,बीड,नांदेड,परभणी,हिंगोली विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश भिक्खु संघाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव पु.भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

 यावेळी भिक्खु संघाला अधिक मजबुत करणे,धम्म प्रचार-प्रसाराचे नियोजन ,सर्व जिल्ह्यातील श्रामणेर तथा भिक्खुंची माहिती गोळा करणे,धम्म आणि विनयाचे महत्त्व अशा अनेक विषयावर दिवसभर चर्चा सञ झाले.तसेच जागतिक किर्तीचे विद्वान बौद्ध भिक्खु डॉ.भदन्त आनंद कौसल्यायन महाथेरो यांची जयंती यावेळी साजरी करण्यात आली.या प्रसंगी भदन्त उपगुप्त महाथेरो यांनी भदन्त आनंद कौसल्यायन यांच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला.बैठकीसाठी पू.भिक्खु  पञ्ञातीस्स थेरो,पु.भिक्खु पञ्ञारत्न थेरो,पु.भिक्खु महाविरो थेरो,पु.भिक्खु मुदितानंद थेरो,पु.भिक्खु धम्मशील थेरो,पु.भिक्खु सुभुती थेरो,पु.भिक्खु शिलरत्न थेरो,पु.भिक्खु संघपाल थेरो,पु.भिक्खु नागसेनबोधी,पु.भिक्खु रेवतबोधी,भन्ते पञ्ञावंश,भन्ते संघरत्न आदिंची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या