💥बिहार राज्याप्रमाणेच महाराष्ट्रात देखील इतर मागासवर्गीयांचा स्वतंत्र जनगणना करा...!


💥परभणी जिल्हा समता परिषदे केली जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी💥

परभणी (दि.12 जानेवारी) : बिहार राज्याप्रमाणेच महाराष्ट्र  राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करावी, अशी मागणी महात्मा फुले युवक समता परिषदेने जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली.

          चक्रधर उगले, नानासाहेब राऊत, बंडू मेहेत्रे, अनिल गोरे, भागवत कासाटे, अ‍ॅड. आर. एन. गायकवाड, माणिकराव सोनवणे, नारायण जाधव, डॉ. सुनील जाधव, अविनाश काळे, राजेंद्र नागरे, कृष्णा टाकरस, कृष्णा कटारे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनास निवेदन सादर करीत या मागणीकडे लक्ष वेधले.

तामिळनाडू, छत्तीसगढ आणि अन्य राज्यांनीसुध्दा ओबीसींची जनगणना सुरु केली असून त्यांच्या राज्याच्या विकासासाठी याचा उपयोग झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना व्हावी. जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे. मात्र, इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्याकरीता केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने बिहार प्रमाणे ओबीसींची स्वतंत्रपणे जनगणना करावी, अशी अपेक्षा या शिष्टमंडळाने व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या