💥सामाजिक स्वाथ्य बिघडविणार्‍या विकृतांच्या विरोधात निश्‍चितच प्रखर लढाई चित्रा वाघ यांची माहिती....!


💥महाराष्ट्रात सातत्याने समाजस्वाथ्य बिघडविणार्‍या विकृती डोके वर काढू लागल्या आहेत : समाजभान राखण्याचे केले आवाहन💥

परभणी (दि.14 जानेवारी) : सामाजिक स्वाथ्य बिघडविणार्‍या विकृतींच्या विरोधात निश्‍चितपणे सातत्याने प्रखर लढा उभारला जाईल तो कोणीही असो या गोष्टींचा विचार केला जाणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या सौ.चित्रा वाघ यांनी दिला.

          भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या निमित्ताने सौ. वाघ या आज शनिवार दि.14 जानेवारी 2023 रोजी परभणीत दाखल झाल्या. त्यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून वाघ यांनी अपप्रवृत्तींवर कडाडून टिका केली. यावेळी आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. विद्याताई चौधरी, कमलकिशोर अग्रवाल, मोहन कुलकर्णी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

          महाराष्ट्रात सातत्याने समाजस्वाथ्य बिघडविणार्‍या विकृती डोके वर काढू लागल्या आहेत. या स्वैराचारास ते स्वातंत्र्याशी नातं जोडू लागले आहेत. परंतु, सामाजिक स्वाथ्य बिघडविणार्‍या या विकृतांना निश्‍चितच जाब दिला जाईल, असे स्पष्ट करीत सौ. वाघ यांनी आपला वाद कोण्या व्यक्ती विरोधात नसून विकृतींच्या विरोधात आहे. हा नंगानाच आम्ही राज्यात चालू देणार नाही. आपण स्वतःसाठी नव्हे समाजासाठी या विकृतींच्या विरोधात ठामपणे उभे राहत आहोत, असेही म्हटले.

           छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्राला या विकृती शोभणार्‍या नाहीत, असे स्पष्ट करीत अभिनेत्री उर्फी जावेद हीच्या विकृतीच्या बाजूने आज अनेकजणे उभे ठाकत आहेत, अशी खंत व्यक्त करीत वाघ यांनी, कोणी सोबत नसले तरी आपण हा लढा सुरू ठेवणार आहोत, तुम्हाला हा नंगानाच मान्य आहे का? असा सवाल केला. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली सुरू असलेला हा स्वैराचार खपवून घेतला जाणार नाही, यात काय चूक आहे, असे त्या म्हणाल्या.

भाजपात महिला कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. घरातील सर्व जबाबदार्‍या सांभाळून महिलांना राजकारण करावे लागते. तरी महिला वेळ देवून पुढे येत आहेत. मात्र केवळ महिला आहे म्हणून पदे मिळणार नाहीत तर त्यासाठी कार्यकतृत्व सिध्द केले पाहिजे, असे आवाहन करीत सौ. वाघ यांनी काम करणार्‍या प्रत्येक महिलेला भाजपमध्ये मोठी संधी आहे. येत्या काही दिवसांत प्रत्येक बुथवर पुरूष कार्यकर्त्यांबरोबर महिला पदाधिकारी देखील दिसेल. यासाठी संघटन बांधणी केली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या