💥परभणी येथील शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर यांना पितृशोक....!


💥जुन्या पिढीतील ख्यातनाम सर्जन डॉ.पांडुरंग नावंदर यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी दुःखद निधन 💥

परभणी (दि.०६ जानेवारी) - परभणी जिल्ह्यातील जुन्या पिढीतील ख्यातनाम सर्जन तथा शहरातील बाल विद्यामंदिर या नामांकीत शैक्षणिक संस्थेचे संस्थापक माजी अध्यक्ष डॉ.पांडुरंग बंकटलाल नावंदर यांचे आज शुक्रवार दि.०६ जानेवारी २०२३ रोजी दुपारच्या सुमारास नांदेड येथील खाजगी रुग्णालयात वयाच्या ८५ व्या वर्षी दुःखद निधन झाले.

डॉ.पांडुरंग नावंदर यांच्या पश्चात पत्नी प्रा.वासंती,दोन मुलडॉ.विवेक व विनय व एक मुलगी विनिता यांच्यासह सुना,नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर उद्या शनिवार दि.०७ जानेवारी २०२३ सकाळी ०९-३० वाजेच्या सुमारास परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. नावंदर जुन्या पिढीतील नामवंत सर्जन होते. तसेच बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या उभारणीत, जडणघडणीत आणि विस्तारीकरणात त्यांचे अमूल्य असे योगदान होते. अतिशय शांत,मनमिळावू, व संयमी सद्गृहस्थ म्हणून ते सर्वदूर परिचत होते. त्यांच्या या निधनाने नावंदर कुटुंबीयांसह नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे....

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर यांचे ते वडील होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या