💥बाप...एक प्रेमाचा झरा : जो त्याच्या भावना दाखवत नाहीं, दाखवू शकत नाही, तो म्हणजे "बाप"....!


💥बाप लेकरावर निशांत प्रेम करत असतो. पण तो जास्त दाखवत नसतो💥

💥लेखीका : ललिता खोंडे तऱ्हाडी

          असे म्हणतात की... स्त्री ला पूर्णत्व तेव्हा प्राप्त होते जेव्हा ती स्त्री आई होते. तिला मातृत्व प्राप्त होते. खरच हे सत्य आहे. तेव्हा ती एक आई होते. जेव्हा पासुन आई होणार आहे हे समजते तेव्हा पासूनच तिचे मातृत्व हळू हळू बाळाच्या वाढी नुसार तिला येत असते. तिला त्या बाळाची आनुभूती येत असते. बाळाच्या वाढीची अनुभूती ती घेत असते. कारण बाळ हे तिच्या उदरामध्ये आगदी सुरक्षित वाढत असते. त्याच्या प्रत्येक हालचालीची अनुभूती ती घेत असते. त्याचा स्पर्श तिला हळू हळू जाणवतो. व ते ती त्या व्यक्तीला सगळं सांगते तो व्यक्ती म्हणजे त्या बाळाचा "बाप".

                                   बाप हा त्या बाळाच्या आईच्या प्रत्यक्ष सांगण्यावरून त्या गोष्टीचा अमूर्त विचार करुन ते क्षण तो आनुभवत असतो. ते क्षण जगत असतो. खरच जेव्हा एका बाळाचा जन्म होतो, बाळ जेव्हा प्रथम दूध प्राशन करते तो क्षण त्या आईच्या मातृत्वाला एका अर्थाने पुर्ण करतो. पण ज्या गोष्टी कडे जास्त कोणी लक्ष देत नाही किवा थोडी दुर्लक्षित होते. जो त्याच्या भावना दाखवत नाहीं, दाखवू शकत नाही, तो म्हणजे "बाप". बाळाचा जन्म होतो तेव्हा स्त्री आई होते. हे सर्वांना प्रत्येक्षात दिसते. पण जेव्हा एक बाळ प्रत्यक्ष या जगामध्ये, या पृथ्वीतलावर जन्माला येते तेव्हा एका "बापा मधील आई " जन्माला येते. ती आई त्या बाळाच्या येण्याच्या चाहूल लागल्यापासून त्या बापामध्ये सुक्तपणे वाढत आलेली असते. पत्नीने सांगितलेल्या त्या दिवसातील नऊ महिन्यातील प्रत्येक क्षणाचा अनुभव तो अमूर्त विचारातून घेत असतो. व त्यातून त्याच्यामध्ये मातृत्व हळूहळू तीळा प्रमाणे वाढत असते. आणि बाळाच्या जन्म बरोबरच बापा मधील आई सुद्धा जन्म घेते. हे ही तेवढेच सत्य आहे.

                                     बाप लेकरावर निशांत प्रेम करत असतो. पण तो जास्त दाखवत नसतो. पण तो करतो. लेकराची भूक भागण्याची अद्वितीय शक्ती व वरदान हे निसर्गाने आईला दिलेली आहे. तेवढे सोडले तर तो त्या लेकरासाठी सर्व करतो वा करू शकतो. तो लहानपणी त्या निरागस लेकराला घेत नाही. अशी गोड तक्रार ही त्या आईची व त्याच्या पालकाची असते. पण तो त्या लेकराला घ्यावेसे वाटत नाही म्हणून घेत नाही तर, त्या लेकराला नीट घेऊ शकणार नाही या प्रेमळ भीतीमुळे तो ते धेर्या  लगेच करत नाही. ते लेकरू रडू लागते तेव्हा तो अस्वस्थ होतो. बाळ भुके मुळे रडत असेल तर तो स्वतःला सामर्थ्य आहे अशी भावना येऊन जाते. पण तो आईच्या मातृत्वाचा भाग आहे. लेकरू पहिले सहा महिने आईच्या सानिध्यात आले की लगेच शांत होते. सुरक्षित वाढते. पण हळूहळू बाळ वाढत जाते तेव्हा ते थोडी हालचाली करतो, रांगते, चालण्याचा प्रयत्न करते. आई-वडिलांना ओळखते तेव्हा पहा ते आई थोडी रागवली तर लगेच त्या बापाला बिलागत हेही त्या बापाच्या मातृत्वाच आहे. असे मला वाटते.

                                  आईचं प्रेम तिचं मातृत्व कमी आहे असं नाही. कारण ते आपण स्वतःलाच विचारू शकतो. पण आपण स्वतःला बाप म्हणून आपले पण विचारू शकतो. बाप हा त्या लेकराचे गोड हट्ट पुरवत असतो. तो बाहेरून कामावरून किती थकून आला तरी त्या लेकरा समोर आल्यावर त्याच्या त्या हसण्यातून सगळ्या थकवा बाजूला सारून तो त्या लेकरा सोबत उत्साहाने सहभागी होतो. त्यासोबत खेळतो. त्याच्या लहान-लहान गोष्टी पुरवतो. वडिलांना पाहून जेव्हा लेकरू त्याच्या नावाचा  पुकार करतो बाबा-बाबा पप्पा-पप्पा म्हणून जवळ येतो खरंच ते एक मौलिक सुवर्ण  सुप्त असा अनुभव येतो.

                                     लेकरू जेव्हा बिमार पडते तेव्हा आईची घालमेल ही होत असते,ती दिसत असते, तिला दाखवता येते. पण तीच गोष्ट तो बाप दाखवत नाही, दाखवू शकत नाही. पण  म्हणून त्याच्या जीवाची घालमेल होत  नाही असे नाही. मधून त्याची सुद्धा घालमेल सुरू असते. तो सर्वां समोर वर्तनातून दाखवू शकत नाही. पण कधी चेहऱ्यावरून दिसते शेवटी तो सुद्धा बाप च आहे. रात्री त्याला पुन्हा पुन्हा पाहत असतो आणि त्यांची जाणीव आईला ही नसते आणि लेकराला ही नसते. रात्री मध्येच उठून जेव्हा लेकरू बाप्पा जवळ येते त्याला उठवत तेव्हा त्या तेवढया रात्री त्या सोबत खेळत असतो. त्या लेकरांच्या हट्टामुळे थोडा वेळ का होईना तो त्या सोबत रात्री खेळतो जे कधी कधी त्या आईला पण माहित नसते. खेळून मग शांत झोपतो पण. जेव्हा ते बापाच्या छाती वर डोक ठेवून आंग आखडून झोपतो तेव्हा तो आणि बाप दोन्ही शांत. छान, सुरक्षित झोपतात. एरवी छाती वर काही ठेवून साध पुस्तक वा मोबाईल ठेवून झोपत नाही. पण लेकराला घेवून अगदी शांत झोपतो लेकराला कुशीत घेवून. ती असते त्या बाप्पा मधील जन्माला आलेली आई जो की तो नेहमी नेहमी दाखवत नसतो, दाखवू शकत नसतो. एक आई जन्माला आली ती तो निरंतर त्या मध्ये सुप्त आवस्थेत आढळत आसते. तो कधी कठोर होईल पण त्याचं मातृत्व पण नेहमी स्थिर असते. हे ही सत्य आहे . कारण तो एक बाप आहे.....                                                

                                                                                          ललिता खोंडे तऱ्हाडी

मो,९४२१९२९३६०

निवास- भोलेनाथ नगर अभानपुर रोड प्लॉट नंबर २०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या