💥पुर्णेत महसुल प्रशासनाने राबवले बेकायदेशीर खडीक्रशर दगडखानपट्टा कारवाईनाट्य : कारवाई मात्र गुलदस्त्यात...!


💥महसुल प्रशासनाने सिल केलेल्या अनेक खडीक्रशर दगडखानपट्यातून उत्खननासह होतेय अवैध खडी निर्मिती💥 

💥तालुक्यातील महसुल प्रशासनात कार्यरत झारीतील शुक्राचार्यांनी गौण खनिज तस्करांशी जोपासले हितसंबंध ?💥


परभणी/पुर्णा (दि.१६ जानेवारी) : परभणी जिल्हा प्रशासनासह महसुल विभाग तसेच पोलिस प्रशासनाला देखील न जुमानता स्थानिक तहसिल व महसुल प्रशासनातील भ्रष्ट झारीतील शुक्राचार्यांच्या खंबीर पाठबळामुळे मुजोर झालेली माफियाशाही गौण खनिज अर्थात रेती दगड मुरुम मातीचे बेकायदेशीररित्या प्रचंड प्रमाणात उत्खनन करीत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसुल शासकीय तिजोरीत जमा न होता झारीतील शुक्राचार्यांच्या घशात जात असल्याचे दिसत असून तालुक्यात सर्वकाही सुरळीत चालत असल्याचा भासवण्यासाठी थातूर मातूर कारवाईनाट्य रंगवून जिल्हा प्रशासनासह महसुल प्रशासनाच्या डोळ्यात सोईस्कररित्या धुळफेक करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून तालुक्यात मागील एक ते दिड वर्षापासून शासन दफ्तरी मुद्दत संपल्यासह बंद असल्याची नोंद असलेले खडीक्रशर दगडखानपट्टे मात्र शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी अर्थात महसुल बुडवून प्रत्यक्षात खुलेआम चालत असल्याचे व प्रचंड प्रमाणात उत्खननासह खडीक्रेशरच्या माध्यमातून खडी निर्मितीसह कालबाह्य झालेल्या व कुठल्याही प्रकारचे इन्श्युरंन्स नसलेल्या असंख्य टिप्पर/हायवा/ट्रक आदी वाहनांतून वाहतूक करीत शासकीय गुत्तेदारांना शासकीय विकासकामांसाठी पुरवठा करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार प्रसारमाध्यमांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर स्थानिक तहसिलदार पल्लवी टेमकर व महसुल प्रशासनातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी दि.१६ डिसेंबर २०२२ रोजी कारवाई नाट्य रंगवून तालुक्यातील शासन दफ्तरी बंदची नोंद असलेल्या ५ खडीक्रेशन दगडखानपट्यांसह अन्य ०९ खडीक्रशर दगडखानपट्टे सिल करण्याचे नाट्य तर सुरळीत रंगवले परंतु यातील अनेक खडीक्रशरधारक अद्यापही बेकायदेशीरपणे आपल्या दगडखानपट्यातून बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात उत्खनन करून खडी निर्मिती करीत असल्याचे दिसत असून स्थानिक प्रशासनाने परवान्यासाठी प्रस्थाव सादर करून त्यांना बेकायदेशीर उत्खननासह परवानाप्राप्त होण्यापुर्वीच शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडवून खडीनिर्मिती करण्यास खुली सुट दिली की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


पुर्णा तालुक्यातील १३ बेकायदेशीर स्टोन क्रेशर खानपट्टा धारकांवर स्थानिक तहसिलदार पल्लवी टेमकर व महसुल प्रशासनाचे नायब तहसिलदार नितेशकुमार बोलेलू यांच्या आदेशाने दि.१६ डिसेंबर २०२२ रोजी संबंधित भागातील मंडळ अधिकारी तलाठी यांनी कारवाई करीत अवैधरित्या चालणाऱ्या स्टोन क्रेशरांना' सिल ठोकण्याचे कारवाई नाट्य सोईस्कररित्या रंगवले खरे मात्र मागील अंदाजे वर्ष दिड वर्षभरापासून संबंधित स्टोन क्रेशर खानपट्टा धारक आपला गैरकारभार खुलेआम चालवत कोट्यावधी रुपयांच्या गौण-खनिजाचे उत्खनन करीत त्याच चोरट्या गौण-खनिजाची शासकीय गुत्तेदारांना लेखी स्वरुपात करार करून विक्री करीत असतांना स्थानिक महसुल प्रशासनाला आपल्या कर्तव्याचा अक्षरशः विसर पडला होता की महसुल प्रशासन जाणीवपूर्वक झोपेचे सोंग घेत होते की काय ? असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच म्हणावे लागेल.

पुर्णा तहसिल व महसुल प्रशासनाने दि.१६ डिसेंबर २०२२ रोजी तालुक्यातील १४ खडीक्रशर खानपट्टे सिल करण्याचे सोपस्कार कागदोपत्री पुर्ण करून दि.१९ डिसेंबर २०२२ रोजी जा.क्र.२०२२/गौण खनिज/कावी या अंतर्गत जिल्हा खनिकर्म अधिकारी परभणी यांना लेखी स्वरुपात पत्र पाठवून गौण खनिजांच्या अनाधिकृत उत्खनन व वाहतूक व वापरास प्रतिबंद करणेकामी कारवाई करणे संदर्भात पत्र पाठवून अवैध उत्खननाची मोजमाप करण्यासाठी ड्रोन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली खरी परंतु या मागणीला जवळपास एक महिन्यांचा कालावधी होत असल्यामुळे कारवाईनाट्य अद्यापही गुलदस्त्यातच असल्याचे एकीकडे निदर्शनास येत असतांना दुसरीकडे मात्र या सिल केलेल्या खडीक्रशर दगडखानपट्यापैकी अनेक खडीक्रशर दगडखानपट्टाधारक आपला कारभार सुरळीतपणे चालवत अधैध उत्खनन व खडीनिर्मितीसह शासनाचा महसुल बुडवून वाहतूक व विक्री करीत असल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास येत आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या