💥पुर्णेत ७ जानेवारीला श्री केदार जगद्गुरु भिमाशंकरलींग शिवाचार्य महास्वामी यांचे आर्शिवचन...!


💥लिंगैक्य सिताराम अप्पा एकलारे यांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना💥

पूर्णा (दि.०३ जानेवारी) - येथिल नांदेड मार्गावरील श्री बाबागुरु हंपय्या स्वामी धाम येथे दि.७ जानेवारी रोजी‌ श्री.श्री.श्री.१००८ जगद्गुरु भिमाशंकरलींग शिवाचार्य महास्वामीजी हिमवतकेदार व ह.भ.प.श्री. अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे हस्ते लिंगैक्य सितारामअप्पा एकलारे यांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार असून, त्यानिमित्ताने श्रीजगद्गुरु यांचे आर्शिवचन व दस्तापुरकर महाराजांचे हरीकार्तन होणार असल्याची माहिती श्री.गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रमोद एकलारे, नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे,जगद्गुरु तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप.सोपानकाका बोबडे यांनी दिली आहे. 

       पूर्णा शहरापासून जवळच असलेल्या श्री.दशमुख शिवाचार्य बाबागुरु हंपय्या स्वामी धाम येथे बाबाराम अप्पा एकलारे यांचे पूण्यस्मरण भक्तिभावाने साजरा करण्यात येतो.दि.७ जानेवारी रोजी केदारनाथ जगद्गुरु श्री.श्री.श्री.१००८ जगद्गुरु भिमाशंकरलींग शिवाचार्य महास्वामीजी व ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये यंदा लिंगैक्य सिताराम अप्पा एकलारे यांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.यानिमीत्य दु १२;३० वाजता जगद्गुरु यांचे आर्शिवचन तर  सकाळी १०;३० ह.भ.प.दस्तापुरकर महाराज यांचे किर्तन होणार आहे.यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्षा श्रीमती गंगाबाई एकलारे, संतोष एकलारे,प्रमोद एकलारे,हभप सोपानकाका बोबडे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या