💥पुर्णेत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न....!


💥स्पर्धा संपल्यानंतर लगेच पेपर तपासून निकाल जाहिर करण्यात आला💥

पुर्णा (दि.१२ जानेवारी) - येथील जुना मोंढा परिसरात आज गुरुवार दि.१२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ०८-०० ते ०९-०० या वेळेत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जयंतीनिमित्त गट-अ व गट-ब या दोन गटात सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली.

गट-अ मध्ये प्रथम क्रमांक-श्री साहेबराव कल्याणकर यांच्या तर्फे 2100₹,द्वितीय क्रमांक ऑक्सफर्ड सेमी इंग्लिश स्कूल,पूर्णा संचालक-प्रा. विनोद कदम व प्रा. पुंडलिक जोगदंड यांच्या तर्फे-1500₹ तर तृतीय क्रमांक- पौळ कोचिंग क्लासेस,पूर्णा श्री पौळ सर यांच्या तर्फे 1100 ₹ तर प्रोत्साहनपर पारितोषिक-श्री माधवराव आवरगंड यांच्या तर्फे 700 ₹,गट ब-मध्ये प्रथम क्रमांक - सह्याद्री कंप्युटर्स पूर्णा श्री निवृत्ती नवघरे यांच्या तर्फे 2100 ₹,द्वितीय क्रमांक-छत्रपती मोबाईल शॉपी,पूर्णा श्री गणेश बुचाले यांच्या तर्फे 1500 ₹,तृतीय क्रमांक स्वराज्य कंप्युटर्स,खूजडा श्री चंद्रकांत कुऱ्हे यांच्या तर्फे-1100 ₹,प्रोत्साहनपर-श्री माधवराव आवरगंड यांच्या तर्फे 700 ₹ ही स्पर्धा संपल्यानंतर लगेच पेपर तपासून निकाल जाहिर करण्यात आला.विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. डॉ.भायेकर साहेब,श्री पौळ सर,श्री आबनराव पारवे, श्री जगदीश जोगदंड प्रा पुंडलिक जोगदंड श्री माऊली कदम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवृत्ती नवघरेसंदीप रेंगे ज्ञानेश्वर कदम नरेश कदम सोनाजी शिंदे गजानन कदम यांनी प्रयत्न केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या