💥पुर्णेतील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त भित्तिपत्रक प्रदर्शनाचे आयोजन.....!


💥यावेळी श्री गुरु बुद्धिस्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रमोद एकलारे यांची प्रामुख्याने उपस्थिती💥 


पूर्णा (दि.२६ जानेवारी) - ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील श्री गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालयात श्री गुरु बुद्धिस्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रमोद एकलारे, सचिव श्री अमृतराज कदम, जेष्ठ संचालक तथा कोषाध्यक्ष मा. उत्तमराव कदम, सहसचिव श्री गोविंदराव कदम, प्राचार्य डॉ के. राजकुमार, उपप्राचार्य डॉ संजय दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विषयायांच्या भित्तिपत्रकांचे आयोजन करण्यात आले होते. वाणिज्य विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षामार्फत “भारतातील आर्थिक संस्था" या विषयावर भित्तिपत्रक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. 


महाविद्यालयातील बी. कॉम.तृतीय वर्षाच्या विदयार्थ्यांनी भिंतीपत्रक प्रदर्शनात सक्रिय सहभाग घेतला. डॉ दिशा मोरे आणि डॉ स्मिता जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गायत्री पारवे, निकिता मोरे, राजश्री कुलकर्णी, ऋतुजा कदम, मनीषा कदम आणि गणेश इंगोले यांनी सहभाग घेऊन  भिंतीपत्रक सादर केले. विदयार्थ्यांनी केलेले भिंतीपत्रक अत्यंत महत्वाचे असून ज्ञानात भर टाकणारे आहे असे मत उदघाट्न प्रसंगी सर्व मान्यवरांनी यांनी व्यक्त केले.  

इतिहास विभागामार्फत डॉ सोमनाथ गुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली भिंतीपत्रक प्रदर्शनात विदयार्थ्यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे महत्व सादर केले. त्यांनी भारत हा विविधतेचा देश आहे, प्रजासत्ताक दिन हा विविध संस्कृती आणि रीतिरिवाजांच्या सुसंवाद, समन्वय आणि संश्लेषणाचा उत्सव आहे .आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या देशासाठी आपले प्राण देणार्‍या राष्ट्रीय वीर आणि सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करून,आपण आपल्या मातृभूमीला वचन देऊ या की,आपण आपली संस्कृती, वारसा आणि नैतिकता जपण्यासाठी, आपल्या अंतःकरणात आणि आत्म्याने ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी समृद्ध करू. आपल्या देशात लोकशाही आणण्यासाठी हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती त्यांचे स्मरण आजच्या दिनी करणे आणि आपला देश आणि त्याचा समृद्ध वारसा चिरंतन सर्वसामान्यात जागृत करण्यासाठी छोटा प्रयत्न मोतीराम कदम, गंगाधर गायगोधने, आकाश भगत या विदयार्थ्यांनी पोस्टरद्वारे केला . व्यवसाय अभ्यासक्रम विभागात श्री आबाजी खराटे तसेच शेख शहेनशहा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रकाद्वारे सामाजिक सलोखा तसेच समानता, बंधुता याविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

 या प्रसंगी डॉ. पुष्पा गंगासागर, डॉ.  राजू शेख, डॉ. वर्षा धुतमल, डॉ. रेखा पाटील, डॉ. उषा मगरे, डॉ. वृषाली आंबटकर, प्रा. जयश्री स्वामी, आबाजी खराटे आबाजी, डॉ. सोमनाथ गुंजकर, श्री अरुण डुब्बेवार श्री बाळासाहेब कुलकर्णी,श्री वसंतराव कदम,  श्री गिरीश शिवणकर,  श्री कालिदास वैद्य तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षेत्तर कर्मचारी विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या