💥वसमत तालुक्यातील आडगाव रंजे गावाजवळ उभ्या बसला मोटार सायकलची धडक पुर्णा तालुक्यातील दोघांचा मृत्यू....!


💥अपघातात मृत्यू झालेले दोघे युवक पुर्णा तालुक्यातील देगाव येथील रहिवासी💥 

पुर्णा (दि.२७ जानेवारी) - वसमत तालुक्यातील आडगाव रंजे बसस्थानकावर हिंगोली येथून परभणीकडे जाणाऱ्या उभ्या एसटी महामंडळाच्या बसला मोटार सायकलने जोरदार धडक दिल्यामुळे मोटार सायकल वरील दोन युवक ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज शुक्रवार दि.२७ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ०७-३० वाजेच्या सुमारास घडली या भयंकर अपघातात मृत्यूमुखी पडलेले दोन्ही युवक पुर्णा तालुक्यातील देगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. 


या घटने संदर्भात सविस्तर माहिती अशी की हिंगोली येथून परभणीकडे जाणारी एसटी महामंडळाची बस क्र.एम.एच.२० बिआय ३३५४ ही वसमत तालुक्यातील आडगाव रंजे बसस्थानकावर सायंकाळी ०७-३० वाजेच्या सुमारास उभी असतांना या बसला मागून आलेल्या एम.एच.२२ एवाय ८७१० या क्रमाकांच्या होंडा शाईन या मोटारसाकलने जोरदार धडक दिली यावेळी मोटार सायकलवर प्रवास करणारे पुर्णा तालुक्यातील देगाव येथील युवक सतिष गुरुलिंग दावलबाजे वय ४० वर्ष व भिमा उत्तमराव कदम वय ३५ वर्ष या दोघांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जख्मी झाले 

यावेळी आडगाव येथील ग्रामस्थांनी तात्काळ ॲम्बुलन्स बोलवून जखमींना हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच हट्टा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, गणेश लेकुळे, सांगळे, वळसे, कदम यांनी घटनास्थळी दाखल झाले.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या