💥आणखी एक वाद : आमदार संतोष बांगर यांच्याकडून प्राचार्याला मारहाण.....!


💥सोशल मीडियावर घटनेचा व्हिडीओ व्हायरल💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली : कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात अडकल्याचे दिसून आले आहे. आता पुन्हा एकदा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला असून यात ते एका व्यक्तीला मारहाण करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.


हिंगोली शहरालगत असणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर शिवीगाळ करत मारहाण केली आहे.आमदार संतोष बांगरच नाही तर बांगर यांचे कार्यकर्ते सुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान हा व्हिडीओ दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याची माहितीसमोर येत आहे.

आमदार बांगर यांनी संबंधित प्राचार्याला का मारहाण केली याचे कारण जरी अस्पष्ट असले तरीही अशा पद्धतीने मारहाण करणे चुकीचेच आहे. आमदार कायदेमंडळात बसून कायदे तयार करतात आणि हेच आमदार बाहेर कसे पायदळी तुडवतात हेच यावरून दिसून येत आहे. या विषयावर आमदार बांगर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 8 जानेवारी रोजी हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई इथल्या मसाई मातेची यात्रेत कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्यांना बोलावलं जात नाही. अनेक वर्षांची ही परंपरा पाहता जिल्ह्यातील राजकीय पुढारी देखील या यात्रेला जाण्यासाठी टाळतात. मात्र असे असताना देखील आमदार बांगर

या यात्रेत गेल्याने गावकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला होता. त्यानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या