💥औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज....!


💥चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि.येथे मतमोजणी : अधिकारी व कर्मचारी यांना उद्या पुन्हा प्रशिक्षण💥

औरंगाबाद (दि.31 जानेवारी) :-  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि. येथे ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकारी व कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असून 1 फेब्रुवारी रोजी मतमोजणीच्या ठिकाणीच दुसरे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

शिक्षक मतदारसंघासाठी औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यांत एकूण 53 हजार 257 मतदारांनी मतदान केले. याची मतमोजणी चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि. येथे होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी 56 टेबलवर मतमोजणी होणार आहे. यासाठी 700 अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतमोजणीची सुरूवात सकाळी 8 वाजल्यापासून होणार आहे. सुरूवातीला मतपेटीतील मतांची मोजणी होईल. त्यानंतर 25 मतपत्रिकेचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिकांचे सरमिसळ करण्यात येईल. यातून 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे 40 गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर देण्यात येतील. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात येईल. एकूण वैध मताप्रमाणे कोटा निश्चित करण्यात येईल.

मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी कक्ष, निरीक्षक कक्ष, सुरक्षा कक्ष, माध्यम कक्ष,  केंद्रावरील टेबल रचना, प्रकाश व्यवस्था, विद्युत पुरवठा, आरओ, एआरओ बैठक व्यवस्था, उमेदवारांसाठी बैठक व्यवस्था तसेच आवश्यक त्या कक्षांची उभारणी करण्यात आली आहे. मतमोजणी कक्षात मोबाईल घेऊन जाता येणार नाही. मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवत जबाबदारी देण्यात आलेल्या ठिकाणीच थांबावे तसेच उमेदवारांनी नेमलेल्या मतमोजणी प्रतिनिधी यांनीदेखील नियुक्ती दिलेल्या ठिकाणीच थाबावे असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे......


***

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या