💥तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर....!


💥भाविकांची  गैरसोय होता कामा नयें याकरिता 300 रुपयांचे तिकीट बुक करण्याची करण्यात आली आहे आॅनलाइन व्यवस्था💥 

 ✍️मोहन चौकेकर 

तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविक जात असतात. काही भाविक आपल्या श्रद्धेमुळे दरवर्षी तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या दर्शनासाठी जात असतात. आता या देवस्थानने आपल्या भाविकांसाठी मोठी खुशखबर दिली आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीस जानेवारी आणि येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जर भाविकांना तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या दर्शनासाठी जायचं असेल तर स्पेशल तिकीटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे तिकीट बूक करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. या दर्शनाच्या एका तिकिटाची किंमत 300 रुपये ठेवण्यात आली आहे.

भारतातील तिरुमला तिरुपती देवस्थान हे देशातील प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक आहे. या ठिकाणी भगवान वेंकटेश्वर स्वामी यांचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक देशभरातील वेगवेगळ्या राज्यांतून येत असतात. भाविकांसाठी गैरसोय न होण्यासाठी दर्शनासाठी आधीच बुकिंग उपलब्ध असेल तर चांगलंच आहे. म्हणून ही स्पेशल तिकीटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

दरम्यान तिरुपतीला दर्शनासाठी जाणार असाल लगेचच बुकिंग करा. कारण आजपासून अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंगला सुरुवात झाली आहे. भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या भक्तांसाठी 300 रुपये किंमतीचे ऑनलाईन कोटा विशेष प्रवेश दर्शन (SED) तिकिटे जारी करण्यात येतील. हे तिकीट 12 जानेवारी ते 31 जानेवारी आणि फेब्रुवारीसाठी असेल.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या