💥एटीएम मशीन मध्ये बिघाड करून बँकांना लाखों रुपयांना गंडवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या अटकेत....!


💥न्यायालयासमोर हजर केले असता त्यास १६ जानेवारीपर्यंत पोलीस सुनावली कोठडी💥.

(फुलचंद भगत)

वाशिम:-ATM मशीनच्या वितरण व्यवस्थेत बिघाड करून बँकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्यास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी नामे अरविंद कुमार अवस्थी यास वि.न्यायालयासमोर हजर केले असता त्यास १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

          पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे अप.क्र.९७९/२२, कलम ४२० भादंवि सहकलम ४३ (ई)(एच), ६६ (सी) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये दाखल गुन्ह्यात दि वाशिम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, वाशिम यांच्या अकोला, अमरावती, वाशिम, मानोरा व रिसोड येथे असणाऱ्या ATM मशीनद्वारे व्यवहार करत असतांना ATM मशीन मधून रोख रक्कम वितरणाचे वेळी दोन बोटे डीस्पेन्सिंग शटरमध्ये ठेवून त्या बोटांच्या सहाय्याने वितरण यंत्रणेच्या रोलसीलला आत ढकलून मशीनमध्ये बिघाड केला जात होता. त्यामुळे पैसे काढूनसुद्धा बँकेचा व्यवहार अयशस्वी दर्शवून तब्बल ७.५५ लाखांची रक्कम काढून घेण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास करत सदर आरोपींना कानपूर, उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले आहे.

          सदर गुन्ह्यात यापूर्वीच अटक करण्यात आलेल्या १) वैभव ऋषभदेव पाठक, वय २३ वर्षे यास वि.न्यायालयाने न्यायालयीन कोठडी तर २) सत्यम शिवशंकर यादव, वय २३ वर्षे, ३) सौरव मनोज गुप्ता, वय २१ वर्षे व ४) प्रांजल जयनारायण यादव, वय २४ वर्षे सर्व रा.कानपूर राज्य-उत्तरप्रदेश यांना दि.१२.०१.२०२३ पर्यंत पोलीस कोठडी व मुख्य आरोपी ५) अरविंद कुमार अवस्थी यास १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यासंदर्भात कारवाई सुरु आहे.


प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या